AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार चीनला आणखी एक झटका देणार?; आता आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आणखी एक पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने दमदार पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. (modi Government to levy customs duty on solar modules)

मोदी सरकार चीनला आणखी एक झटका देणार?; आता आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आणखी एक पाऊल
| Updated on: Dec 14, 2020 | 12:34 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने दमदार पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस चीनला आणखी एक झटका देण्याची मोदी सरकारने तयारी सुरू केली आहे. आधी चायनीज अॅपवर बंदी, त्यानंतर स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पीएलआयची घोषणा करून भारताला आत्मनिर्भर करण्याकडे वाटचाल करून चीनला मोठा झटका दिला आहे. आता सरकार सोलर मॉड्युलवर लागणाऱ्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा विचार करत आहे. भारतात सर्वाधिक सोलर पॅनल आणि त्याच्याशी संबंधित सामानांची चीनकडून आयात केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या हालचाली सुरू केल्या आहेत. (modi Government to levy customs duty on solar modules)

नोटीफिकेशन जारी होणार

सरकारने सोलर मॉड्युल्सवरील कस्टम ड्युटी 40 टक्क्याने वाढवण्याची तयारी केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून त्याबाबतचं नोटिफिकेशन्स निघण्याची शक्यता आहे. नव्या नियमानुसार सोलर सेल्सवर 25 टक्के ड्युटी लावण्यात येऊ शकते. चीन आणि मलेशियाकडून होणाऱ्या आयातीवर 15 टक्के सेफगार्ड ड्युटी लावली जाते. त्याऐवजी आता ती 25 टक्के होणार आहे. 2021 पासून हे आयात शुल्क वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

किंमतीवर परिणाम होणार

सरकारने सोलर मॉड्युल्सच्या आयातीचं शुल्क वाढवल्यास त्यामुळे सोलर पॅनल आणि त्याच्याशी संबंधित सामानांची किंमतही वाढणार आहे. देशांतर्गत होणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारला ग्रीन एनर्जी मार्केटचा फायदा उठवायचा आहे. तसेच ग्लोबल सप्लाय चेनमध्येही मोठी भूमिका निभावण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

सोलर मार्केटमध्ये चीनचा दबदबा

भारतातील सध्याच्या सोलर मार्केटमध्ये चीनचा दबदबा आहे. भारतात सध्याच्या घडीला चीन आणि मलेशियातून सोलरशी संबंधित उपकरणांची आयात केली जाते. या आधी सरकारने 30 जुलै 2018 मध्ये चीन आणि मलेशियातून आयात होणाऱ्या सोलर सेल्स आणि मॉड्युल्सवर सेफगार्ड ड्युटी लावली होती. भारत सरकार चीनकडून मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन उपकरणे, औषधांची एपीआय आणि सोलर मॉड्युल्सची आयात करतो. (modi Government to levy customs duty on solar modules)

संबंधित बातम्या:

चीन आणि पाकिस्तानशी एकाचवेळी युद्ध झाल्यास भारत काय करणार?

चालू आर्थिक वर्षात भारत बाँड ईटीएफचा तिसरा टप्पा येणार; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?

चीनींची आता सोन्याची जमाखोरी, सोनं घसरणार की वाढणार?

(modi Government to levy customs duty on solar modules)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.