चीनींची आता सोन्याची जमाखोरी, सोनं घसरणार की वाढणार?

भारतात सोन्याचे भाव गेल्या आठवड्यात घसरले असले तरीही किरकोळी सोने विक्रीचं प्रमाण घसरलं आहे (Gold buyers put off by price rebound).

चीनींची आता सोन्याची जमाखोरी, सोनं घसरणार की वाढणार?
सोने चांदी दर

मुंबई : भारतात सोन्याचे भाव गेल्या आठवड्यात घसरले असले तरीही किरकोळी सोने विक्रीचं प्रमाण घसरलं आहे. भारतात सोन्याचे भाव कमी होऊनही हवी तशी विक्री झालेली नाही. मात्र, दुसरीकडे चीनमध्ये गेल्या आठवड्यात सोन्याची मागणी वाढली आहे. चिनी लोकांनी आपला गुंतवणुकीचा मोर्चा सोन्याकडे वळवला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याची मागणी वाढल्याने अनेक सोने विक्रेत्यांनी सोन्याचा साठा करण्यास सुरुवात केली आहे (Gold buyers put off by price rebound).

भारतात सोनेविक्री का घटली?

भारतात सोन्याचा दर शुक्रवारी (11 डिसेंबर) 49 हजार 100 रुपये प्रती एक तोळे असा होता. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 47 हजार 550 रुपयांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, भारतात गेल्या आठवड्यात सोन्याचा दरात घट झाली तरी किरकोळ विक्रीत का घट झाली आहे? याबाबत काही तज्ज्ञांनी इंग्रजी वृत्तपत्रांना प्रतिक्रिया दिली आहे. “सोन्याच्या दरात सारखा उतारचढाव येत असल्याने सोन्याच्या विक्रीत घट झाली”, अशी प्रतिक्रिया बेंगळुरूच्या चेमनूर ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक अनूप चेमनूर यांनी दिली आहे.

सध्या सोन्याबाबत कोणताही खास असा ट्रेंड स्पष्ट होताना दिसत नाही, त्यामुळे सोन्याचे व्यापारी गोंधळले आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या एका सोने व्यापाऱ्याने दिली (Gold buyers put off by price rebound).

सोन्याचा भाव नियमित कमी-जास्त होत असतो. काही दिवसांपूर्वी तर देशात सोन्याचा भाव 55 हजार प्रति एक तोळे असा झाला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात हा दर पाच हजारांनी कमी झाला.

चीनमध्ये मागणी वाढली

दुसरीकडे चीनमध्ये सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. चीनमध्ये सोने 19 ते 24 डॉलर प्रती औंस सवलतीच्या दरात विकलं गेलं. कोरोना संकटामुळे चीनमध्ये सोने व्यापाऱ्यांना सवलती द्याव्या लागल्या. चीनमधील सोने खरेदीबाबत हॉंगकाँगचे मौल्यवान धातू विश्लेषक सॅमसन ली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याची मागणी वाढल्याने दागिने विक्रेत्यांनी वर्षअखेरीस मालाचा साठा करुन ठेवला आहे, असं त्यांनी सांगितलं.

चिनी लोकांची सोन्यात गुंतवणूक वाढण्यामागे कारण काय?

सोन्याचे दर महागाईच्या दरानुसार वाढत असतात. त्याचबरोबर जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर अस्थिरता निर्माण झाल्यास सोन्याचे दर आणखी वाढतात. आपण कधीही, कुठेही सोन्याचे पैशांत रुपांतर करु शकतो. सोने कमीत कमी जागेत जास्तीक जास्त मूल्य ग्रहित करुन ठेवू शकतं. याचा अर्थ असा की जर दहा लाख रोख रक्कम ठेवण्यासाठी जितकी जागा लागेल त्यापेक्षा प्रचंड कमी जागा दहा लाखांच्या किंमतीच्या सोन्याला जपून ठेवण्यासाठी लागते. हेच गणित लक्षात ठेवून चिनी नागरिक आपले पैसे सोन्यात गुंतवत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सोन्याच्या दरात अस्थिरता

संसाधनांची मागणी वाढली तर त्याचा परिणाम थेट त्याच्या किंमतीवर होतो. मात्र, सोन्याचा दर कधीच निश्चित नसतो. भारतात शेअर मार्केटच्या दरावरुन सोन्याचे दर मागेपुढे होतात. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील परिणाम सोने, पेट्रोल, डिझेल यांच्या किंमतीवर होतो. देशात कोरोना संकट काळात प्रती दहा ग्रॅम सोन्याचा दर थेट 55 हजारांवर पोहोचला होता. मात्र, हा दर गेल्या आठवड्याभरात पाच हजारांनी खाली घसरला. विशेष म्हणजे भाव कमी होऊनही खरेदी करणारे ग्राहक मार्केटमध्ये हवे तसे नाहीत. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI