AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचतीचा सोपा मार्ग! ‘इथे’ करा गुंतवणूक; 21 वर्षांमध्ये मिळवा 1 कोटी रुपये

पैशांची योग्य ठिकाणी आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळू शकतो. जाणून घ्या अशाच एका चांगल्या योजनेबद्दल

बचतीचा सोपा मार्ग! 'इथे' करा गुंतवणूक; 21 वर्षांमध्ये मिळवा 1 कोटी रुपये
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 6:20 AM
Share

नवी दिल्ली – आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षीत असावे, येणाऱ्या पिढीला आर्थिक मदत व्हावी आणि आपल्या निवृत्तीनंतर बँकेमध्ये मजबूत बँक बॅलन्स असावे. या उद्देशातून एखादा व्यक्ती आयुष्यभर काम करून पौसा कमावतो. मात्र त्या पौशांची  योग्य ठिकाणी गुंतवणूक न झाल्यास त्याच्या हाती फारसे काही पडत नाही. परंतु त्याच पैशांची योग्य ठिकाणी आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळू शकतो. निवृत्तीनंतर जर तुम्हाला एक मजबूत बँक बॅलन्स हवा असेत तर आजपासूनच बचतीची सुरुवात करावी लागेल. मात्र ही बचत कुठे गुंतवावी? हे देखील महत्त्वपूर्ण आहे. आज आपण असाच एक बचतीचा सोपा आणि अधिक परतावा देणारा मार्ग जाणून घेणार आहोत.

इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर 

तुम्ही जर तुमची बचत फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला चांगला परतावा मिळेलच याची खात्री नसते.आता तर अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर कमी केले आहेत. मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेवर आपल्याला जास्तीत जास्त वार्षिक 6 टक्के दराने व्याज मिळू शकते. मात्र तेच पौसे आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्यास आपल्याला दुपटीने परतावा मिळू शकतो. इक्विटी म्युच्युअल फंड हे दीर्घकाली गुंतवणूकीसाठी चांगले मानले जातात. तसेच त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर आपल्याला सरासरी वार्षिक आधारावर 12  टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

मुदत ठेव योजनेपेक्षा दुप्पट परतावा 

जर तुमचे वय सध्या 30 वर्ष असेल  आणि तुम्ही रोज 300 रुपयांची बचत करत असाल, ही बचत जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवली तर पुढील 21 वर्षांनंतर सरासरी एक कोटींच्या आसपास रक्कम तुम्हाला मिळू शकेल.  निवत्तीपूर्वीच एक मोठी रक्कम तुमच्या हातात आल्याने तुम्ही 60 वर्षांच्या आतच  निवृत्तीचा देखील निर्णय घेऊ शकता. साधारणपणे एसआयपी इक्विटी म्युच्युअल फंड हे वर्षाला सरासरी 15 टक्के व्याज दराने परतावा देण्यासाठी ओळखले जातात. हे व्याज फिक्स डिपॉझिटच्या तुलनेमध्ये दुपटीने अधिक असतात. मात्र पैशांची कोणत्याही योजनेत गुंतवणुक करताना त्याचे सर्व फायदे तोटे समजून घेऊन, खात्री करूनच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

संबंधित बातम्या

Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; जाणून घ्या देशात पेट्रोल स्वस्त होणार की महागणार?

निर्मला सितारमण साधणार बँकांच्या प्रमुखांशी संवाद; ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती