Mukesh Ambani Reliance: रिलायन्सचा जगात पुन्हा डंका, मुकेश अंबानी यांची कंपनी टॉप 100 मध्ये

Mukesh Ambani Reliance Top 100: मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिओच्या आयपीओने दमदार कामगिरी केल्यानंतर आता रिलायन्सने जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये क्रमांक पटकावला आहे.

Mukesh Ambani Reliance: रिलायन्सचा जगात पुन्हा डंका, मुकेश अंबानी यांची कंपनी टॉप 100 मध्ये
रिलायन्सचा जगात पुन्हा डंका, मुकेश अंबानी यांची कंपनी टॉप 100 मध्ये
| Updated on: Nov 04, 2026 | 1:18 PM

Mukesh Ambani Reliance Top 100: देशातील सर्वात मोठी मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने गेल्या दोन दिवसात 12 टक्क्यांची झेप घेतली. यासह कंपनीने जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये क्रमांक पटकावला आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी या यादीत समावेश असलेली एकमेव कंपनी ठरलेली आहे. रिलायन्सच्या शेअरने सोमवारी 11.64 टक्क्यांची तेजी दिसली. तर मंगळवारी हा शेअर 0.55 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. या कंपनीचे मार्केट कॅप 17.60 लाख कोटींच्या घरात पोहचले आहे.

रिलायन्स कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ

Loading...

रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 17.60 लाख कोटींच्या घरात पोहचले आहे. companiesmarketcap.com ने ही माहिती दिली आहे. सध्या मार्केट कॅपच्या हिशोबाने ही कंपनी या यादीत 99 व्या क्रमांकावर आहे. या कंपनीचे मार्केट कॅप $4.990 ट्रिलियन डॉलर आहे. आयफोन तयार करणारी ॲप्पल कंपनी $4.843 ट्रिलियनसह दुसऱ्या ठिकाणावर सरकली आहे.

यादीत अमेरिकेन कंपन्यांचा दबदबा

जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये अमेरिकेचा दबदबा आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील 62 कंपन्या या यादीत आहेत. तर चीनच्या दहा कंपन्या या यादीत आहेत. चायना कन्स्ट्रक्शन बँक $462.86 अब्ज बाजारी भांडवलासह या यादीत 26 व्या क्रमाकांवर आहे. तर ब्रिटेनच्या 5, स्वित्झर्लँड आणि फ्रान्सच्या प्रत्येकी तीन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या प्रत्येकी दोन कंपन्या या ग्लोबल 100 कंपन्यांमध्ये समाविष्ट आहेत.

टॉप 10 मध्ये कोण?

टॉप 10 मध्ये अमेरिकन कंपन्यांचे वर्चस्व आहे. अमेरिकेतली आठ कंपन्या टॉप 10 मध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये एआय चिप तयार करणारी एनव्हिडिआ आणि ॲप्पल कंपनीसह मायक्रोसॉफ्ट, गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट, ॲमेझॉन, स्पेसएक्स, मेटा प्लेटफॉर्म्स आणि ब्रॉडकॉमचा समावेश आहे. या यादीत तायवानची चिप तयार करणारी कंपनी टीएसएमसी 2.099 ट्रिलियन डॉलरसह सहाव्या आणि सौदी अरामको 1.687 अब्ज डॉलरसह आठव्या क्रमांकावर आहे.

सोमवारी मोठी झेप

राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज NSE च्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या 6 वर्षांतील एकाच दिवसातील सर्वात मोठी तेजी सोमवारी दिसली. या तेजीच्या सत्रानंतर मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी बुकमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला फायदा झाला आहे. 2 नोव्हेंबर रोजी बाजार बंद होईपर्यंतच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजा एक्सपोजर वाढून 4,711 कोटी इतका झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us