Multibagger Stock: 20 रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 20 टक्क्यांनी सुसाट धावला

Penny Stock: या पेनी स्टॉकमध्ये आज मोठी उसळी दिसून आली. स्मॉल कॅप कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी सुसाट धावला. गेल्या एका वर्षात हा शेअर जितका घसरला, तितकाच तो वधारला. कोणती आहे ही कंपनी? कसा झाला मोठा फायदा?

Multibagger Stock: 20 रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, 20 टक्क्यांनी सुसाट धावला
शेअरमध्ये तुफान
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 17, 2026 | 4:15 PM

Multibagger Stock: स्मॉल कॅप आयटी कंपनी केल्टन टेक सोल्युशन्स (Kelton Tech Solutions) या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी, 17 फेब्रुवारी रोजी मोठी उसळी दिसून आली. डिसेंबर 2025 मधील तिमाही निकालात कंपनीने चांगली कामगिरी बजावली. ही बातमी येताच इंट्राडेमध्ये कंपनीचा शेअर जवळपास 19.3 टक्क्यांनी उसळला. हा शेअर वधारून 20.37 रुपयांच्या दिवसभराच्या उच्चांकावर पोहचला. गेल्या 52 आठवड्यात हा शेअर तुफान आपटला आहे. जानेवारी 202 मध्ये हा शेअर 14.57 रुपयांपेक्षा निच्चांकावर होता. तर गेल्या एका वर्षात हा शेअर 19 टक्क्यांनी आपटला. सहा महिन्यात हा शेअर 27 टक्क्यांनी घसरला. तर एका महिन्यात या शेअरमध्ये जवळपास 20 टक्क्यांची उसळी दिसली.

डिसेंबर तिमाही निकाल काय?

कंपनीच्या तिमाही निकालानुसार, डिसेंबर 2025 तिमाहीत नफ्यात मोठी वाढ दिसून आली. वार्षिक आधारावर 22 टक्क्यांची वाढ होऊन हा नफा 255 दशलक्ष रुपयांवर पोहचला. कंपनीचा एकूण महसूल 10.6 टक्क्यांनी वाढून तो 3,088 दशलक्ष रुपयांवर पोहचला. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा महसूल 2,793 दशलक्ष रुपयांवर पोहचला. कंपनीचा EBITDA 397 दशलक्ष रुपये आणि मार्जिन 12.9 टक्के इतका आहे. कंपनीसाठी हे सकारात्मक संकेत आहेत.

कंपनीकडे अनेक कामं

कंपनीच्या तिमाहीत AI आधारित डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट्समध्ये मोठी मजबूत आघाडी घेतली आहे. बॅकिंग, दूरसंचार, उत्पादक आणि जागतिक एंटरप्राईज क्षेत्रात अनेक मोठंमोठ्या ऑर्डर आहेत. यामध्ये जागतिक बँकांमध्ये एआय आधारीत पेमेंट ट्रान्सफॉर्मेशन, दूरसंचार कंपन्यांसाठी एजेंटिक एआयच्या माध्यमातून कोणत्याही धोक्यापासून , सायबर गुन्ह्यापासून सुरक्षा, संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेसाठी जेनरेटिव्ह एआय तंत्रज्ञान प्रकल्पाचा समावेश आहे. तर इतर ही अनेक प्रकल्प कंपनीकडे एका रांगेत आहेत. कंपनीचे चेअरमन निरंजन चिंताम यांनी कंपनीने डबल डिजिट रेव्हेन्यू ग्रोथ आणि 22 टक्के नफा वाढीबद्दल कौतुकाने सांगितले. आता कंपन्या GenAI चा प्रयोग करून पुढे जात आहेत. केल्टन KAI हा प्लॅटफॉर्म मजबूत करत आहे. भविष्यात कंपनी अजून मोठा पल्ला गाठणार असा दावा त्यांनी केला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.