आजपासून ‘या’ 5 गोष्टी बदलणार, बँक खात्यापासून स्वयपांकघरापर्यंत परिणाम होणार

| Updated on: May 01, 2021 | 1:14 PM

1 म्हणजेच आजपासून काही गोष्टींचे नियम बदलणार आहेत, त्याचा नागरिकांवर परिणाम होईल. 1 may new rules

आजपासून या 5 गोष्टी बदलणार, बँक खात्यापासून स्वयपांकघरापर्यंत परिणाम होणार
1 पासून बदलणाऱ्या गोष्टी
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करण्यात येत आहे. दुसरीकडे केंद्र सरकार गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करणार आहे. 1 मेपासून इतर काही नियम लागू होणार आहेत. यातील काही नियम तुमचं जीवन सुसह्य बनवू शकतील, तर काही नियमांचं पालन न केल्यास तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. ( New rules free ration distribution to vaccination above 18 years implemented from 1st May check details)

अ‌ॅक्सिस बँकेचा ग्राहकांना झटका

देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असणाऱ्या अ‌ॅक्सिस बँकेने त्यांच्या बचत खाते धारकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. अ‌ॅक्सिस बँकेच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्याच्या मोफत मर्यादेनंतर पैसे काढल्यास दुप्पट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. जर तुम्ही, मर्यादेनंतर 1 हजार रुपये काढले तर तुम्हाला 10 रुपये शुल्क द्यावं लागेल.याशिवाय बँकेने एसएमएस चार्जेस देखील वाढवले आहेत.

गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार

सरकारी मालकीच्या तेल कंपन्या जर महिन्याच्या 1 तारखेला गॅसचे नवे दर जाहीर करतात. 1 मे रोजी म्हणजेच आज नवे दर जाहीर केले जातील.गेल्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात दिलेला दिलासा कायम राहणार का? हे पाहायला लागेल.

गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य

केंद्र सरकारनं देशातील नागरिकांसाठी गरीब कल्याण योजनेअंतर्गत दोन महिन्यासाठी अन्नधान्य मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांअतर्गत धान्याचं वाटप आजपासून सुरु होणार आहे. केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यानं हा निर्णय घेतलाय.

18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण

भारतात 1 मे म्हणजेच आजपासून 18 ते 44 वर्षांच्या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांना मदत होईल. लसीकरण अभियान सुरु होण्यापूर्वी कोविन अ‌ॅपवर नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

आरोग्य विमा संरक्षण वाढ

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात भारतीय विमा नियामक प्राधिकरण संस्था म्हणजेच आयआरडीएनं आरोग्य विमा संरक्षण रकमेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 1 मे पासून 10 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा योजना जारी करण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या:

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात लोकल सुरु करता येणार, वडेट्टीवारांना विश्वास

कोरोनानंतरचा भारतात पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना, भारत विरुद्ध इंग्लंड मॅचकडे साऱ्यांचं लक्ष!

( New rules free ration distribution to vaccination above 18 years implemented from 1st May check details)