मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात लोकल सुरु करता येणार, वडेट्टीवारांना विश्वास

कोरोनाबाबत मुंबईसह महाराष्ट्राची परिस्थिती सध्या पूर्वपदावर आली आहे, त्यामुळे लोकल सुरु करण्यात कुठलाही अडथळा नाही, असंही ते म्हणाले.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात लोकल सुरु करता येणार, वडेट्टीवारांना विश्वास
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 11:04 AM

मुंबई : सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर या प्रतिक्षेत आहेत (Local Train Could Be Started From 1st January). मुंबईकरांची ही प्रतिक्षा अखेर संपणार आहे. येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीपासून मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात येईल, त्यावर विचार सुरु आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली. कोरोनाबाबत मुंबईसह महाराष्ट्राची परिस्थिती सध्या पूर्वपदावर आली आहे, त्यामुळे लोकल सुरु करण्यात कुठलाही अडथळा नाही, असंही ते म्हणाले (Local Train Could Be Started From 1st January).

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“या 15 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण, घटती रुग्ण संख्या, बरे होणारे रुग्ण आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती निवळली आहे. त्यामुळे जानेवारीत नीवन वर्षात ट्रेनला आम्ही पटरीवर आणू आणि सर्वसामान्यांसाठी ही सेवा सुरु होईल असा विश्वास आहे”, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

गेल्या आठ महिन्यांपासून लोकलला रेड सिग्नल

गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबरनंतर सुरु होण्याच्या निर्णयाला पुन्हा एकदा खो मिळाला. कोरोनाचा धोका पाहता येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासनाची नजर ठेवली जाणार आहे. यानंतरच लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यानंतर मुंबई महापालिका कोरोनाला हरवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली. मुंबईत कोव्हिड नियंत्रणात आला आहे. मात्र, डिसेंबर महिन्यापासून चाचण्या झालेल्या व्यक्तींपैकी केवळ 5 टक्के रुग्णांना कोव्हिडची बाधा झाल्याचे आढळत आहे. मात्र, तरीही कोव्हिड पूर्णपणे संपलेला नाही (Local Train Could Be Started From 1st January).

“येत्या 20 डिसेंबरपर्यंत कोव्हिड परिस्थितीचा अंदाज घेण्यात येईल. तसेच, नाताळ आणि नववर्षाचा विचार करुन लोकल सुरु करण्याबाबत विचार करु,” अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली होती.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली नसली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. मे आणि जून महिन्यात चाचणी झालेल्यांपैकी 38 टक्के रुग्ण कोरोनाबाधित आढळत होते. मात्र, आता 5 डिसेंबरपासून हे प्रमाण 5 टक्क्यांवर आले आहे. पुढील काही दिवस कोरोनाच्या आकडेवारी नजर असणार आहे, असंही त्यांनी सांगतिलं होतं.

Local Train Could Be Started From 1st January

संबंधित बातम्या :

लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोकलमध्ये नो एंट्री, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच, मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.