आजपासून युपीआयचे नवे नियम लागू, या पेमेंटच्या मर्यादेत झाली वाढ, जाणून घ्या सर्व

उद्या म्हणजेच १४ सप्टेंबर पासून युपीआय पेमेंटचे नवीन नियम लागू होणार आहेत. प्रमुख सेक्टरसाठी आता युपीआयने होणाऱ्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

आजपासून युपीआयचे नवे नियम लागू, या पेमेंटच्या मर्यादेत झाली वाढ, जाणून घ्या सर्व
UPI Payment new rule
| Updated on: Sep 15, 2025 | 11:59 AM

UPI New Rule: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( एनपीसीआय ) ने उद्या १५ सप्टेंबरपासून व्यक्ती ते व्यापारी ( पी 2 एम ) देवाण-घेवाणची दैनिक मर्यादा वाढवून दहा लाख रुपये केली आहे. या निर्णय त्या क्षेत्रांसाठी मदतगार साबित होणार आहे. जेथे आधी कमी पेमेंट मर्यादा असल्याने लोकांना युपीआय वापरताना अडचणी येत होत्या.

विमा आणि गुंतवणूक

– शेअर बाजारातील गुंतवणूक आणि विम्याचा हप्ता भरण्याची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे.

– परंतू एकूण दैनंदिन देवाणघेवाण १० लाख रुपयांपेक्षा अधिक करता येणार नाही.

– सरकारी देयके आणि GEM पोर्टल

– सरकारी ई-मार्केटप्लेस (GEM) पोर्टलवर प्रति देवाण-घेवाणाची मर्यादा १ लाख रुपयांवरुन वाढवून ५ लाख करण्यात आली आहे.

– यामध्ये कर भरणा आणि बयाणा रक्कम जमा करणे यांचा समावेश आहे.

ट्रॅव्हल सेक्टर

– प्रवासा संदर्भातील देवाण- घेवाणची मर्यादा आता ५ लाख रुपये ( आधी १ लाख रुपये ) झाले आहे.

– एकूण दैनिक मर्यादा 10 लाख रुपये राहणार आहे.

क्रेडिट कार्ड बिल आणि कर्जाचा हप्ता

– यूपीआयच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड देयक भरण्याची मर्यादा प्रति देवाण-घेवाण मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. , परंतू याची मर्यादा प्रति दिन ६ लाख रुपये आहे.

– कर्जाचे हप्ते संकलनाची मर्यादा प्रति देवाण-घेवाण ५ लाख रुपये आणि प्रति दिन १० लाख रुपये करण्यात आली आहे.

दागिने आणि बँकिंग सेवा

– यूपीआयच्या माध्यमातून दागिने खरेदी करण्याच्या मर्यादा वाढवून २ लाख रुपये प्रति देवाण-घेवाण व्यवहार करण्यात आली आहे.आणि दैनंदिन मर्यादा ६ लाख रुपये केली आहे.

– डिजिटल ऑनबोर्डिंगद्वारे मुदत ठेवींसारख्या बँकिंग सेवांसाठी,देवाण-घेवाण मर्यादा प्रति व्यवहार प्रति दिन ५ लाख रुपये करण्यात आली आहे.

व्यक्ती-ते-व्यक्ती (पी2पी) पेमेंटमध्ये कोणताही बदल केलेला नाही

– पी2पी पेमेंटची दैनिक मर्यादा पूर्वी प्रमाणे 1 लाख रुपये प्रति दिन रहाणार आहे.