आता बच्चे कंपनीही ऑनलाईन पेमेंट करु शकणार, UPI साठी बँक अकाऊंटची गरज नाही

आरबीआयने जुनियो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला डिजिटल वॉलेट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.त्यामुळे बँक खात्यांशिवाय युपीआयचा वापर करता येणार आहे.

आता बच्चे कंपनीही ऑनलाईन पेमेंट करु शकणार, UPI साठी बँक अकाऊंटची गरज नाही
| Updated on: Nov 08, 2025 | 9:33 PM

RBI Junio Payments: आरबीआयने बदलता काळ आणि तंत्रज्ञान पाहून Junio Payments प्रायव्हेट लिमिटेड वॉलेट सेवा सुरु करण्यास अनुमती दिली आहे. भारत आज सर्वात मोठा डिजिटल पेमेंटचे वापर करणारा देश ठरला आहे. आज छोट्या दुकानदारांपासून मोठ्या मॉलपर्यंत लोक ऑनलाईन पेमेंटचा बिनधास्त वापर करत आहेत.

आज बहुतेक दुकानदार डिजिटल पेमेंटची सुविधा वापरत आहेत. तुम्हाला डिजिटल पेमेंट करण्यासाठी बँक खात्याची गरज असते. परंतू आरबीआयच्या नव्या योजनेनुसार ज्या युजरचे बँक खाते नाही, ते देखील आता डिजिटल पेमेंट करु शकणार आहेत. आरबीआयने जुनियो अंतर्गत लवकरच युपीआयशी संलग्न एक नवीन डिजिटल वॉलेट लाँच करण्याची तयारी केली आहे. याचा वापर ज्यांचे बँक खाते नाही असेही लोक करु शकणार आहेत.

जूनियो पेमेंट्स मुलांना अर्थसाक्षर करणार

अंकित गेरा आणि शंकर नाथ यांनी मुले आणि तरुणांसाठी जुनियो ऐपची सुरुवात केली आहे. या ऐपचा हेतू मुलांना जबाबदारीने पैसे खर्च करायला शिकवणे आणि बचत करण्याची सवय लावणे हा आहे. ज्युनियओ पेमेंट्सचा वापर करण्यासाठी मुलांचे आई-वडील यात पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत.

तसेच खर्च मर्यादा निश्चित करण्यासह प्रत्येक ट्राक्झंशनवर नजर राखण्याची सुविधा देखील ज्युनिओ पेमेंट्स देते. ऐपमध्ये अनेक आकर्षक फिचर देखील उपलब्ध आहेत. ऐपमध्ये टास्क रिवॉर्ड आणि सेव्हींग्स गोल्स सारख्या सुविधा आहेत. ज्यामुळे मुलांना अर्थ साक्षर होता येईल. आता पर्यंत दोन दशलक्ष मुलांनी ज्युनिओ पेमेंट्स ऐपचा वापर केला आहे.

कसे काम करते जूनियो पेमेंट्स?

जूनियोची सर्वात खास बाब म्हणजे मुलांना बँक खात्याशिवाय युपीआय क्युआर कोड स्कॅन करुन सहजपणे पेमेंट करता येणार आहे. ही सुविधा एनपीसीआयच्या युपीआय सर्कल इनिशिएटीव्हीशी जोडलेली आहे. ज्याअंतर्गत युजर्सचे पालक आपल्या युपीआय अकाऊंटला मुलांच्या वॉलेटशी लिंक करु शकणार आहेत.

या ऐपमुळे मुलाचे आर्थिक समज विकसित करणे सोपे जाणार आहे. त्यांना पैसे कसे खर्च करावे आणि त्यांची बचत कशी करावी याची माहिती मिळणार आहे.