AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crude Oil Price : जे नको तेच घडलं, चिंता वाढवणारी बातमी; कच्च्या तेलाचे पुन्हा भडकले भाव, पेट्रोल-डिझेलचे दर आता..

Crude Oil Price : पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या इराणला दिलेल्या कठोर इशार्‍यानंतर जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $90 च्या पुढे गेल्या असून, यामुळे जागतिक स्तरावर इंधन दरवाढीची भीती व्यक्त होत आहे. OPEC+ च्या संभाव्य उत्पादन घट आणि हूती बंडखोरांच्या शुल्क आकारणीच्या धमक्यांमुळे दर $100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Crude Oil Price : जे नको तेच घडलं,  चिंता वाढवणारी बातमी; कच्च्या तेलाचे पुन्हा भडकले भाव, पेट्रोल-डिझेलचे दर आता..
कच्च्या तेलाचे भाव भडकल्याने चिंतेचं वातावरण, इंधनाच्या दरांवर काय होणरा परिणाम?Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 30, 2026 | 8:05 AM
Share

Crude Oil Price : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम जागतिक तेलबाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिल्याने वातावरण तापलं आहे. ट्रम्प यांनी इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर खळबळ माजली असून परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमतींनी वर उसळी मारली असून, प्रति बॅरलची किंमत ही 90 डॉलरच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. मात्र यामुळे जगाची चिंता वाढणार असून परिणामी इंधनाच्या दरातही वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. जगभरासह भारतात याचे काय पडसाद उमटतात, इथे इंधनाच्या दरांवर काय परिणाम होतो याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलं आहे.

ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा

इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा केला. त्यानंतर अमेरिका आणि सौदी अरेबियाने इराकमधील इराणसमर्थक गटांवर संयुक्त हवाई कारवाई केल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता वाढली. Fox News ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “अमेरिका आता शांत बसणार नाही. अमेरिकन तळांवर होणाऱ्या हल्ल्यांना इराणला थेट जबाबदार धरले जाईल आणि त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या विधानामुळे अमेरिका-इराण संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून जगभरात चिंतेचं वातावरण आहे.

तेलाच्या किमती 100 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता

बुधवारी रात्री 8.20 वाजेपर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीत 7.68 टक्क्यांची वाढ होऊन त्या 90.54 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. DBS बँकेच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत ब्रेंट क्रूडची किंमत 80 ते 100 डॉलर प्रति बॅरल या दरम्यान राहू शकते. तसेच OPEC+ ऑक्टोबरपासून उत्पादन वाढवण्याची योजना काही काळासाठी पुढे ढकलू शकते. DBS बँकेचे ऊर्जा संशोधन प्रमुख सुव्रो सरकार यांच्या मते, ट्रम्प यांनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी हॉर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे तणाव कमी झाला तरी कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली जाण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे.

हूती बंडखोरांकडून जहाजांवर शुल्क आकारण्याची शक्यता

रॉयटर्सच्या अहवालानुसार, येमेनमधील हूती बंडखोर दक्षिण लाल समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून शुल्क आकारण्याचा विचार करत आहेत. तसेच चीनने आपल्या तेलवाहू जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी हूती गटाशी थेट चर्चा केल्याचेही वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (API) च्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 24 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा सुमारे 33 लाख बॅरलने घटला आहे. हूती विद्रोही वसूल सकते हैं शुल्क

OPEC+ चा निर्णयही ठरू शकतो महत्त्वाचा

रॉयटर्सच्या माहितीनुसार, OPEC+ ऑक्टोबरपासून पुढील तीन महिन्यांसाठी उत्पादन वाढवण्याचा निर्णय स्थगित करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास जागतिक बाजारातील तेलपुरवठा मर्यादित राहू शकतो, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींना आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, OPEC+ ने उत्पादन वाढ रोखली आणि त्याचवेळी इराणशी संबंधित संघर्ष अधिक तीव्र झाला, तर कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलचा टप्पाही ओलांडू शकतात.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...