जेफ बेजोसच्या लग्नात भारतातून फक्त एका व्यक्तीला आमंत्रण, कोण आहेत नताशा?

जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेज यांच्या लग्नात मोठा खर्च झाला. ४.८ अब्ज रुपये या लग्नात खर्च करण्यात आले. एका रिपोर्टनुसार फक्त फुलांच्या सजावटीसाठी ८ कोटी रुपये खर्च झाले. जगभरातील अनेक दिग्गज या समारंभात आले.

जेफ बेजोसच्या लग्नात भारतातून फक्त एका व्यक्तीला आमंत्रण, कोण आहेत नताशा?
natasha poonawalla
| Updated on: Jun 28, 2025 | 2:35 PM

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जेफ बेजोस यांनी २७ जून रोजी इटलीत लग्न केले. या रॉयल वेडिंगची जगभर चर्चा झाली. या लग्नात हॉलीवूडपासून उद्योगजगातील मोठ्या व्यक्ती आल्या होत्या. या लग्न समारंभाचे भारतातील एकमेव व्यक्तीला आमंत्रण मिळाले होते. केवळ नताशा पूनावाला यांना आमंत्रण मिळाले होते. जेफ बेजोस यांनी आमंत्रण दिलेल्या नताशा पूनावाला आहेत तरी कोण?

जेफ बेजोस यांच्या लग्नाचे आमंत्रण मिळालेल्या नताशा पूनावाला सामान्य व्यक्तीमत्व नाही. भारतातील सर्वात प्रसिद्ध फार्मा कंपनीशी संबंधित आहेत. त्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांच्या पत्नी आहेत. या कंपनीने भारतात कोविड-19 दरम्यान कोविशील्ड वॅक्सीनची निर्मिती केली होती. फॅशनच्या जगात नताशा यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते. त्यांना अनेक वेळा मेट गालासारख्या हाय-प्रोफाइल इव्हेंट्समध्ये पाहिले गेले आहे. त्यांची स्टाइल, एलिगेंस आणि पर्सनॅलिटीने त्यांना फक्त भारतात नाही तर जगभरातील ग्लॅमरचे आयकन बनवले आहे.

नताशा यांना का मिळाले लग्नाचे आमंत्रण?

नताशा यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली पकड आहे. हॉलीवूडपासून बिजनेस टायकून्सपर्यंत त्यांचे अनेकांसोबत चांगले नाते आहे. फॅशन, चॅरिटी आणि सोशल वर्कच्या विश्वात त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना या सर्वाधिक प्रतिष्ठीत लग्नाचे आमंत्रण मिळाले.

जेफ बेजोसच्या लग्नात ४.८ अब्ज खर्च

जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेज यांच्या लग्नात मोठा खर्च झाला. ४.८ अब्ज रुपये या लग्नात खर्च करण्यात आले. एका रिपोर्टनुसार फक्त फुलांच्या सजावटीसाठी ८ कोटी रुपये खर्च झाले. इटलीतील लक्झरी रिसोर्टमध्ये हा लग्न समारंभ झाला. लग्नाच्या नियोजनावर २६ कोटी रुपये आणि लग्न स्थळासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात आला. लॉरेन सांचेझ हिच्या लग्नाच्या पोशाखाची किंमतही १३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या लग्नात सिलिकॉन व्हॅलीमधील दिग्गज, हॉलीवूड सेलेब्रिटी, आंतरराष्ट्रीय टायकून आणि जेफ बेजोस यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. श्रीमंत व्यक्तीचे लग्न जागतिक इव्हेंट बनत असल्याचे या लग्नातून सिद्ध झाले.