Pallonji Mistry : पद्मभूषण उद्योजक शापूरजी पालोनजी यांचं निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अब्जाधीश आणि शापुरजी पालोनजी समुहाचे अध्यक्ष पल्लोनजी मिस्त्री यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांनी विविध व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आणि तो व्यवसाय यशोशिखऱावर नेला. जगातील श्रीमंताच्या यादीत ही त्यांचा पहिल्या 50 उद्योगपतींमध्ये समावेश होता.

Pallonji Mistry : पद्मभूषण उद्योजक शापूरजी पालोनजी यांचं निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
उद्योगपती मिस्त्री यांचे निधन
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 28, 2022 | 12:19 PM

अब्जाधीश आणि शापुरजी पालोनजी समुहाचे(Shapoorji Pallonji) अध्यक्ष पल्लोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप (passed away) घेतला. त्यांनी विविध व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आणि तो व्यवसाय यशोशिखऱावर नेला. जगातील श्रीमंताच्या यादीत (Richest Man) ही त्यांचा पहिल्या 50 उद्योगपतींमध्ये समावेश होता. आशियापासून तर आफ्रिकेपर्यंत त्यांच्या उद्योगाचा व्याप आहे. या समुहाच्या विविध कंपन्यांमध्ये 50 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. गुजरातमध्ये एका पारसी उद्योगपती कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. आर्यलंडचे ते सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 2003 साली त्यांनी लग्नानंतर आयरीश नागरिकत्व (Irish Citizenship) स्वीकारले होते. उद्योग आणि व्यापारात त्यांनी आणि त्यांच्या समुहाने खास छाप सोडली. देशासाठी केलेल्या अमूल्य योग्यदानाबद्दल त्यांचा 2016 साली केंद्र सरकारने पद्म भूषण (Padma Bhushan) पुरस्कार देऊन सत्कार केला होता.

विविध व्यवसायत मोहर

शापुरजी पालोनजी समुह जगभरात पसरला आहे. भारतातच नव्हे तर आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशात या समुहाने पाय रोवले आहेत. शापूरजी पालोनजी समूहाचे अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा आणि वित्त अशा सेवा क्षेत्रात मोठे नाव आहे. शिस्त आणि व्यावसायिकतेच्या जोरावर या समुहाने सर्वदूर त्यांची मोहर उमटवली. आजची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत याच समुहाने बांधली आहे. तर मुंबईतील सर्वांचे लाडके ब्राबोर्न स्टेडियम उभारण्याचे श्रेय ही पालोनजी मिस्त्री यांच्याकडे जाते.

जागतिक अब्जाधीशांच्या यादीत

पलोनजी मिस्त्री हे जागतिक अब्जाधीश होते. जगातील श्रीमंतांच्या 50 जणांच्या यादीत त्यांचा 41 वा क्रमांक होता. त्यांची एकूण संपत्ती 10 अब्ज डॉलर आहे. पलोनजी मिस्त्री हे भारतातील सर्वात यशस्वी आणि शक्तीशाली उद्योगपतींपैकी एक होते. या समुहाला त्यांनी नवीन ओळख दिली. या समुहाचा व्यवसाय जगभरात पोहचवण्याचे श्रेय त्यांनाच जाते. पण ते फारसे सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही.
त्यांच्या पश्चात दोन मुले शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री तर दोन मुली लैला मिस्त्री आणि आलू मिस्त्री असा परिवार आहे.

 

सर्वोच्च पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित

व्यापार आणि उद्योगात केलेल्या कामगिरी बद्दल भारत सरकारने 2016 साली पालोनजी मिस्त्री यांना पद्य भुषण पुरस्काराने गौरवले आहे. हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. त्यांच्या पश्चात दोन मुले शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री तर दोन मुली लैला मिस्त्री आणि आलू मिस्त्री असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.