Paytm ची ग्राहकांना गुड न्यूज, दिवाळीआधी युजर्सना गिफ्ट

| Updated on: Nov 02, 2020 | 6:46 PM

पेटीएम वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर करण्यावर 5 टक्के शुल्क आता काढून टाकण्यात आला आहे.

Paytm ची ग्राहकांना गुड न्यूज, दिवाळीआधी युजर्सना गिफ्ट
Follow us on

नवी दिल्ली : डिजिटल वित्तीय सेवा देणारी कंपनी पेटीएम (Paytm) ने दिवाळीआधी ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. पेटीएम वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर करण्यावर 5 टक्के शुल्क आता काढून टाकण्यात आला आहे. कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. (paytm diwali gift to remove charges to add money in your account from wallet)

आता मोफत आहे सेवा
खरंतर, पेटीएम वॉलेटमधून आपल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 5 टक्के शुल्क द्यावा लागतो. पण आतापासून हा द्यावा लागणार नाही. याचवेळी, पेटीएमवर बँक खात्यातून पैसे जोडण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. म्हणजेच आधी पेटीएमवरून तुमच्या खात्यात 5000 रुपये जोडण्यासाठी तुमचे 250 रुपये रापले जायचे पण आता ही रक्कम कापली जाणार नाही.


क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये कोणताही बदल नाही
कंपनीने ही सुविधा फक्त पेटीएम वॉलेटमधून पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी सुरू केली आहे. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे इथे शुल्क आकारला जाईल. कंपनीने हा नियम 15 ऑक्टोबरपासून लागू केला होता. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे जोडले तर त्याला 2 टक्के अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे. या दोन टक्के शुल्कात जीएसटीदेखील असणार आहे.

अशी करा 1 लाखांपर्यंत खरेदी
पेटीएमच्या पोस्टपेड सेवेमधून तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही किराणा, किरकोळ दुकानात आणि सगळ्यात खास म्हणजे कोणत्याही आवडत्या अ‍ॅप्सवर खरेदी करू शकता. पेटीएम पोस्टपेड ग्राहकांना डिजिटल क्रेडिट ऑफर देत आहे.

इतर बातम्या – 

कोणताही फोन खरेदी करा आणि मिळवा 100 टक्के कॅशबॅक, Flipkart ची जबरदस्त ऑफर

ICICI बँकेच्या नफ्यामध्ये मोठी वाढ, कोरोनाच्या संकटातही 6 पटीनं झाला फायदा

(paytm diwali gift to remove charges to add money in your account from wallet)