Paytm कडून क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय, गुंतवणूकदार आणि यूजर्सवर काय परिणाम होणार?

| Updated on: May 22, 2021 | 12:16 PM

क्रिप्टोकरन्सीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका लक्षात घेता पेटीएमनं मोठा निर्णय घेतला आहे. Paytm Cryptocurrency

Paytm कडून क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय, गुंतवणूकदार आणि यूजर्सवर काय परिणाम होणार?
पेटीएम
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोरन्सी खूप चर्चेत आहे. जगातील प्रमुख उद्योजक एलन मस्क यानं ट्विट करुन बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतर बिटकाईनच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. दुसरीकडे क्रिप्टोकरन्सीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका लक्षात घेता पेटीएमनं मोठा निर्णय घेतला आहे. पेटीएम पेमेंट बँकेतील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचा बँकिंग सपोर्ट बंद करण्याचा निर्णय पेटीएमनं घेतला आहे. आतापर्यंत क्रिप्टोकरन्सी एक्सजेंच Wazrix, Zebpay, CoinSwitch, Kumber व्यवहारांसाठी पेटीएम पेमेंट बँक प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. (Paytm payment bank stop banking support to cryptocurrency exchange Wazirx Zebpay and other platforms)

पेटीएमकडून अधिकृत घोषणा नाही?

पेटीएम पेमेंट बँकेकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी वजीर एक्स यांच्याकडून ट्विट करुन ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मे पासून वजीर एक्स पेटीएम बँक अकाऊंटमध्ये भारतीय चलनात रक्कम स्वीकारणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. माहितीअभावी एखाद्या व्यक्तीनं RTGS/ NEFT / IMPS द्वारे पैसे पाठवल्यात ते त्याच्या खात्यामध्ये 7-10 दिवसांमध्ये परत पाठवले जाणार आहेत.

वजीर एक्सचं ट्विट

वजीर एक्स बिटकॉईन अँड क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज इन इंडिया या ट्विर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आळी आहे. भारतात वजीर एक्सला नवीन पार्टनरच्या शोधात असून तोपर्यंत WazirX P2P हा पर्याय वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

क्रिप्टोकरन्सीबाबत रिझर्व्ह बँकेची भूमिका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2018 मध्ये भारतातील बँकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंचसाठी करु नये, असे निर्देश दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टानं मार्च 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात निकाल दिला होता. यानंतर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज साठी बँकिंग सपोर्टचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या गेल्या काही दिवसांमधील रिपोर्टनुसार आरबीआय़ क्रिप्टोकरन्सीसाठी बँकिग सेवा देण्यास मनाई करत आहे.

संबंधित बातम्या:

Cryptocurrency बाबतच्या एक ट्विटमुळे हिरो बनला झिरो, Elon Musk वर जगभरातून टीकेची झोड

अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण…

(Paytm payment bank stop banking support to cryptocurrency exchange Wazirx Zebpay and other platforms)