AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार? आखातातील तणावादरम्यान सरकारकडून सर्वात मोठी अपडेट

Fuel Price : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. यावर आता पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार? आखातातील तणावादरम्यान सरकारकडून सर्वात मोठी अपडेट
Fuel Price will not HikeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 23, 2026 | 3:37 PM
Share

गेल्या दोन महिन्यांमध्ये जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. इराण आणि अमेरिकेतली संघर्ष कमी झाला असता तरी दोन्ही देशांमधील तणाव मात्र काय आहे. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. यात देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू शकतात असं सांगण्यात आलेले आहे. आता सरकारने यावर महत्त्वाची अपडेट दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने म्हटलं?

तेलाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होत असताना आता इंधनांच्या किमतीबाबत केंद्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. सरकारने अशा सर्व बातम्यांचे खंडन करत स्पष्ट केलं आहे की, इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही आणि अशा कोणत्याही निर्णयावर विचार सुरू नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं आहे. यात या बातम्यांना पूर्णपणे खोटं आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. या बातम्यांचा उद्देश नागरिकांमध्ये भीती आणि घबराट निर्माण करणं असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.

सोशल मीडियावरही स्पष्टीकरण

पेट्रोलियम मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रालयाने म्हटले की, ‘काही रिपोर्ट्समध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. अशा बातम्या लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत आणि त्या खोट्या आहेत.’

गेल्या चार वर्षांत दरवाढ नाही

पेट्रोलियम मंत्रायलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत हा असा एकमेव देश आहे जिथे गेल्या चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर जरी वाढले तरी त्याचा थेट भार नागरिकांवर पडू नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे दरवाढ करण्याची गरज पडलेली नाही.

भारतातील सध्याचे पेट्रोल-डिझेल दर

  • दिल्ली: पेट्रोल – 94.77 रुपये प्रति लिटर, डिझेल – 87.67 रुपये प्रति लिटर
  • मुंबई: पेट्रोल 103 रुपये, डिझेल – 90 रुपये प्रति लिटर

Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!