AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? किती दिवसाचा इंधन साठा शिल्लक? सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा?

Petrol-Diesel Price Hike: भारत हा एकूण गरजेच्या जवळपास 88 टक्के कच्चे तेल आयात करतो. एकूण आयातीमधील अधिकहून वाटा पश्चिम आशियातून येतो. इराणजवळील होमुर्ज समुद्रधुनीतून हा इंधन पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल महागाईची अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. खरंच इंधन महाग होणार?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? किती दिवसाचा इंधन साठा शिल्लक? सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा?
पेट्रोल-डिझेल किंमतImage Credit source: टीव्ही ९मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 1:20 PM
Share

Petrol-Diesel Price Hike: मध्य-पूर्व देशात तणाव वाढला आहे. इराणविरोधात अमेरिका आणि इस्त्रायलसोबत अरब राष्ट्रांची सहानुभूती दिसून येत आहे. Strait of Hormuz च्या समुद्रधुनीतून इंधनचा पुरवठा करण्यात येतो. या ठिकाणीच सध्या युद्धाचे गडद सावट आहे. इराण कदाचित हा मार्ग बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगात इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. वृत्त संस्था भाषा नुसार, भारताकडे सध्या जवळपास 40–45 दिवसांचा इंधनसाठा आहे. ऊर्जा बाजाराची विश्लेषक फर्म Kpler च्या विश्लेषणानुसार, भारताकडे जवळपास 10 कोटी बॅरल कच्चा तेलाचा साठा आहे. त्यात रिफायनरी, जमिनीतंर्गत पेट्रोलियम टँक आणि भारताकडे येत असलेल्या जहाजांवरील तेल साठ्याचा समावेश आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर परिणाम होणार?

भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास 88 टक्के कच्चे तेल आयात करतो. एकूण तेल आयातीतील मोठा वाटा हा पश्चिम आशियातून भारतात येतो. भारत प्रतिदिवशी सरासरी जवळपास 50 लाख बॅरल कच्चे तेल आयात करतो. यामधील जवळपास 25 लाख बॅरल प्रतिदिवशी याच मार्गाने येते. कॅप्लरचे प्रमुख संशोधक आणि विश्लेषक सुमित रितोलिया यांचे म्हणणे आहे की, पश्चिम आशियातून जर पुरवठा साखळी तात्पुरती विस्कळीत झाली तर त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर आणि किंमतीवर दिसून येऊ शकतो.

रिफायनरींनी जर तेल साठा असाच टिकून ठेवला आहे. त्यातच जे जहाजं तेल घेऊन निघाली आहेत. ते जर आपत्कालीन परिस्थिती पोहचले तर संकट पुढे ढकलू शकते. पण आयात, इतर खर्च आणि पर्यायी स्त्रोतांकडून खरेदी करणे यामुळे किंमती घसरू शकतात. ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहचली आहे. इराण संकटापूर्वी किंमतीत 10 टक्के वाढ झाली होती.

स्ट्रेट ऑफ हॉर्मूज का महत्त्वाचं?

भारताने गेल्यावर्षी आर्थिक वर्षात कच्चा तेलाच्या आयातीवर 137 अब्ज डॉलर खर्च केले होते. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी या कालावधीत 20.63 कोटी टन कच्च्या तेलाच्या आयातीवर 100.4 अब्ज डॉलर खर्च झाले होते. होर्मुज समुद्रधुनीतून जवळपास 33 किलोमीटर अरुंद मार्ग जातो. हा जलमार्ग फारस आखाताला अरबी समुद्राला मिळतो. जगात समुद्रामार्गे होणार्‍या कच्चा तेलाची निर्यात जवळपास एक तृतीयांश आहे. जागतिक नैसर्गिक वायु पुरवठा जवळपास 20 टक्के इतका आहे. तो याच मार्गाने जातो.

गरज पडली तर भारत, पश्चिम अफ्रिका, लॅटिन अमेरिका, अमेरिका आणि रशियाकडून अतिरिक्त तेल खरेदी करून पुरवठा वाढवू शकतो. तज्ज्ञानुसार, भौतिक तुटवड्याऐवजी किंमतीतील अस्थिर आणि आयात बिलात वाढीची भीती असते. पण जर युद्ध लांबले आणि पुरवठा विस्कळीत झाला तर मात्र किंमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...