पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

| Updated on: Jun 13, 2021 | 10:15 PM

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी विक्रम केलाय. शतक पार केलेल्या इंधनाने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. असं असताना मोदी सरकारचे मंत्री मात्र अजब तर्क लावत या इंधनदरवाढीचं समर्थन करताना दिसत आहेत.

पेट्रोल-डिझेलचं शतक, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर
Dharmendra Pradhan
Follow us on

Petrol Diesel latest price नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी विक्रम केलाय. शतक पार केलेल्या इंधनाने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. असं असताना मोदी सरकारचे मंत्री मात्र अजब तर्क लावत या इंधनदरवाढीचं समर्थन करताना दिसत आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारला अधिकच्या पैशांची गरज असल्याने जास्तीचा कर लावावा लागत असल्याचा अजब तर्क दिलाय. त्यांनी रविवारी (13 जून) बोलताना राजस्थान आणि महाराष्ट्र या काँग्रेसशासित राज्यांना इंधन दरात कपात करण्यास सांगितलं. मात्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह इतर भाजपशासित राज्ये इंधन कपात करणार का? यावर मात्र त्यांनी मौन बाळगलं (Petroleum Minister Dharmendra Pradhan justify Fuel price hike).

देशभरात इंधनाच्या दराने 100 रुपयांचा पल्ला पार केलाय. याचा सर्वस्वी भार सर्वसामान्या नागरिकांच्या खिशावर पडत आहे. एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊन, तर दुसरीकडे पगार कपात, बेरोजगारी आणि इतर सर्व संकटांमध्ये इंधन दरवाढीने नागरिकांचं जगणं मुश्किल केलंय. अनेकांचे आर्थिक गणितं कोलमडली आहेत. मात्र, मोदी सरकार यावर कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.

6 आठवड्यात पेट्रोल 5.72 रुपये आणि डिझेल 6.25 रुपये प्रति लिटर महागलं

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “काँग्रेसला सर्वसामान्यांवरील इंधन दरवाढीच्या बोजाची चिंता असेल तर त्यांनी काँग्रेसशासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी.” मागील 6 आठवड्यांमध्ये पेट्रोल 5.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 6.25 रुपये प्रति लिटर महागलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात केंद्राच्या आणि राज्याच्या करांमुळे पेट्रोल डिझेलच्या किमतींनी विक्रम केलाय.

सरकारला इंधनावर अधिक कर हवा

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने महाराजा अग्रसेन रुग्णालयात सुरू केलेल्या ऑक्सिजन संयंत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “कोरोना साथीरोगाशी लढण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांना पेट्रोल, डिझेलवरील करांमधून येणाऱ्या अतिरिक्त पैशांची गरज आहे.” इंधन दरवाढीमुळे ग्राहकांना फटका बसत असल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं.

राहुल गांधी काँग्रेस शासित राज्यांमध्ये इंधन दरवाढ कमी का करत नाही?

काँग्रेस नेते राहुल गांधी इंधन दरवाढीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना प्रधान म्हणाले, “महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमध्ये इंधन महाग आहे. राहुल गांधींना गरीबांवरील इंधन दरवाढीच्या बोजाचा इतकी चिंता आहे तर त्यांनी काँग्रेसशासित राज्यांमध्ये दर कपात करण्याबाबत सांगावं.”

भाजपशासित मध्य प्रदेश, कर्नाटकमध्येही इंधन दर 100 पार

प्रधान यांनी इंधन दरवाढीवरुन काँग्रेसवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपशासित मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये देखील इंधनांचे दर 100 पार गेलेत.

हेही वाचा :

स्वतः पेट्रोलियम मंत्र्यांनीही मान्य केलं, 7 वर्षात घरगुती गॅसची किंमत दुप्पट, पेट्रोल-डिझेलवरील करात 459 टक्के वाढ

‘निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हेच का तुमचे वित्तनियोजन?’

Petrol Diesel Rate: मुंबई-पुण्यात इंधनाच्या दरात उसळी; जळगावात अफवेमुळे पेट्रोल पंप एका दिवसात रिकामा

व्हिडीओ पाहा :

Petroleum Minister Dharmendra Pradhan justify Fuel price hike