‘निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हेच का तुमचे वित्तनियोजन?’

कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. | Hike Petrol diesel rates

'निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हेच का तुमचे वित्तनियोजन?'
जयंत पाटील आणि निर्मला सीतारामन
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 12:56 PM

मुंबई: निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel) दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ केली जाते. हे काय वित्त नियोजन आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला. कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (NCP leader Jayant Patil slams Finance minister Nirmala sitharaman Petrol Diesel rates hike)

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90.68 रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 89.75 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा, असे मत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले.

मुंबई-पुण्यात इंधनाच्या दरात उसळी

लॉकडाऊनच्या संकटामुळे सामान्य लोकांना आर्थिक चणचण जाणवत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel price) दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल (Petrol price) आणि डिझेलच्या दरात पुन्हा काही पैशांची वाढ नोंदवण्यात आली. आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 89.75 इतका आहे. (Petrol and diesel rates in Maharashtra)

पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 98.36 , डिझेल 89.75 पुणे: पेट्रोल- 98.06, डिझेल 88.08 नवी मुंबई- 98.56, डिझेल 89.94 नाशिक: पेट्रोल- 98.76, डिझेल 88.76 औरंगाबाद: पेट्रोल- 99.60, डिझेल 90.99

जळगावात अफवेमुळे एका दिवसात पेट्रोल पंप रिकामा

जळगावच्या मुक्ताईनगर परिसरात मंगळवारी एका अफवेमुळे लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. पुढील दहा दिवस पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशी अफवा या भागात पसरली होती. त्यामुळे कुऱ्हाड येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यापैकी एका पेट्रोल पंपातील इंधनाचा साठा पूर्णपणे संपला.

याविषयी, पेट्रोल पंपाच्या चालकाला विचारले असता त्याने ही अफवा फेटाळून लावली. पेट्रोल-डिझेल नियमित मिळणार आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले. मात्र, तरीही लोकांनी लांबच लांब रांगा लावून पेट्रोल-डिझेल विकत घेतले.

(NCP leader Jayant Patil slams Finance minister Nirmala sitharaman Petrol Diesel rates hike)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.