प्लास्टिकच्या बाजारात कधी येणार, जुन्या नोटा बंद होणार? सरकारने संसदेत दिली सर्वात मोठी अपडेट

Plastic Notes India : केंद्र सरकारने संसदेत प्लास्टिकच्या नोटांबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या नोटा बाजारात कधी येणार? जुन्या नोटांचे काय होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

प्लास्टिकच्या बाजारात कधी येणार, जुन्या नोटा बंद होणार? सरकारने संसदेत दिली सर्वात मोठी अपडेट
Plastic Note big update
Image Credit source: Google
| Updated on: Jul 28, 2026 | 8:50 PM

भारतातील चलनी नोटांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी काळात बाजारात 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पाहायला मिळणार आहेत. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्लास्टिकच्या नोटांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लवकरच 10 आणि 20 च्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटा प्रायोगिक चाचणीसाठी छापण्यात येणार आहेत. आता केंद्र सरकारने संसदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या नोटा बाजारात कधी येणार? जुन्या नोटांचे काय होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार 10 आणि 20 रुपयांच्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. हा ट्रायल यशस्वी ठरल्यास या नोटा नियमित चलनात आणण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. पॉलिमर नोटा या पारंपरिक कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरता येण्यास सक्षम मानल्या जातात, त्यामुळे वारंवार नोटा छापण्याची गरज भासणार नाही. सरकारने हे स्पष्ट केले आहे की, सध्या कागदी नोटा बंद करण्याचा किंवा त्या पूर्णपणे पॉलिमर नोटांनी बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे कागदी नोटा बंद होणार नाही.

अनेक देशांमध्ये प्लास्टिक नोटांचा वापर

RBI च्या मते, पॉलिमर नोटा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत असून त्यांचे आयुष्यही जास्त आहे. अनेक देशांमध्ये आधीपासूनच प्लास्टिकच्या नोटांचा वापर केला जात आहे, याचे सकारात्मक देखील परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे भारतही आता या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याच्या तयारीत आहे.

डिजिटल पेमेंटवर काय परिणाम होणार?

सरकारने हेही स्पष्ट केले की, प्लास्टिकच्या नोटा बाजारात आल्यावर डिजिटल पेमेंटवर काय परिणाम होईल, याबाबत आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. या नोटा नियमितपणे सर्वसामान्यांच्या वापरात आल्यानंतरच त्याचा परिणाम स्पष्ट होईल. RBI चे म्हणणे आहे की रोख व्यवहार आणि डिजिटल पेमेंट हे एकमेकांचे पूरक आहेत. भविष्यातही UPI, कार्ड, ऑनलाइन पेमेंट यांसोबतच रोख व्यवहारालाही तितकेच महत्त्व राहणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us