AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 वेळा नकार, अखेर मराठमोळ्या अभिनेत्याने हिंदी चित्रपटत गाजवलं मराठी गाणं; काही मिनिटांची भूमिका…

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याचा काही मिनिटांचा कॅमिओ असो किंवा एखादं गाणं असो गाजलं की जगभरच चर्चा. अभिनेता उपेंद्र लिमये यांनीही ‘अनिमल’ चित्रपटात फ्रेडी पाटील ही छोटी भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. या भूमिकेचा कालावधी कमी असला, तरी त्यातील मराठी गाण्यामुळे हा प्रसंग विशेष चर्चेत आला.

| Updated on: Nov 04, 2026 | 11:00 AM
Share
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. या चित्रपटात रणबीर कपूरसह अनेक कलाकार झळकले.मात्र उपेंद्र लिमये यांचा कॅमिओ अवघ्या 10 मिनिटांचा असला, तरी त्याची सर्वत्र चर्चा झाली.

1 / 5
विशेष म्हणजे, फ्रेडी पाटीलच्या भूमिकेसाठी उपेंद्र लिमये यांनी सुरुवातीला नकार दिला होता. संदीप रेड्डी वांगा यांच्या टीमकडून त्यांना दोनदा फोन आला, मात्र दोन्ही वेळा त्यांनी नकारच दिला. त्यानंतर दिग्दर्शकांनी प्रत्यक्ष भेटीत त्यांना या भूमिकेची गोष्ट समजावून सांगितली. याचा त्यांनी स्वतः खुलासा केला.

2 / 5
अभिनेता उपेंद्र लिमये यांनी नुकत्याच एका मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या. “फ्रेडी पाटील ही भूमिका एवढी वर्क होईल असं वाटलं होतं का?” विचारताच यावर त्यांनी स्पष्ट केले, “फ्रेडी पाटील वर्क होईल असं वाटलं होतं...पण, इतका तुफान वर्क होईल असं वाटलं नव्हतं.” या भेटीनंतर त्यांना भूमिकेचे महत्त्व समजले आणि त्यांनी होकार दिला.

3 / 5
या प्रसंगात ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ चित्रपटातील ‘डॉल्बी वाल्या’ हे गाणे वाजते. मराठी प्रेक्षकांमध्ये हे गाणे आधीपासूनच लोकप्रिय आहे. ‘अनिमल’मधील प्रसंगात हे गाणे आणि उपेंद्र लिमये यांची फ्रेडी पाटील ही व्यक्तिरेखा यांची छान सांगड घातली गेली आणि हे गाणं देशभर चर्चेचा विषय ठरलं.

4 / 5
अभिनेता उपेंद्र यांनी पुढे सांगितले, “एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सिनला प्रेक्षकांचं प्रेम मिळेल, मला वाटलं नव्हतं. मला तेव्हा माझा मुलगा म्हणाला होता, बाबा ‘अनिमल’मधील त्या सिनला तू नाही म्हणाला असतास तर तुला आयुष्यभर पश्चाताप झाला असता का? माझंही उत्तर होतं ‘हो’! खरंच मी नकार दिला असता तर, मला पश्चातापच झाला असता.” त्यांनी संदीप यांच्याबद्दलही आदर व्यक्त केला. “अशी सगळी चांगली माणसं मला आयुष्यात भेटली,” असेही ते म्हणाले.

5 / 5
Follow Us
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?