पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर तुम्हाला मिळू शकते 7000 रुपयांपर्यंतची कर सवलत, नेमकी कशी? जाणून घ्या

| Updated on: Jul 09, 2021 | 12:35 PM

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं सगळ्यात सुरक्षित मानलं जाते. त्यामुळे अनेकजण पोस्टात खाते सुरु करुन गुंतवणूक करतात. पोस्टात बचत खाते उघडल्यानंतर तुम्हाला आर्थिक फायदा तर मिळतो पण त्यासोबतच करातही सूट मिळते.

पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर तुम्हाला मिळू शकते 7000 रुपयांपर्यंतची कर सवलत, नेमकी कशी? जाणून घ्या
एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघांचा विमा, केवळ 4 हजारांत सुरू करा पॉलिसी
Follow us on

मुंबई : जर तुम्हाला अगदी सुरक्षित आणि गुंतवणुकीवर कुठल्याही धोका नको असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं सगळ्यात सुरक्षित मानलं जाते. त्यामुळे अनेकजण पोस्टात खाते सुरु करुन गुंतवणूक करतात. पोस्टात बचत खाते उघडल्यानंतर तुम्हाला आर्थिक फायदा तर मिळतो पण त्यासोबतच करातही सूट मिळते. जर तुमचे पोस्टात अकाऊंट असेल तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात वर्षात 3,500 रुपयांपर्यंत मिळणारे व्याज हे करमुक्त असते. तर जाईंट अकाऊंटवर 7 हजार रुपयांपर्यंत व्याज हे करमुक्त असते. (Post Office savings account interest earned in financial year is tax exempt Know the details)

पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर जवळपास 4 टक्के व्याज मिळू शकतो. तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या बचत खात्यावरील व्याजदर हा केवळ 2.7 टक्के इतका आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणाऱ्यांना आकर्षक आणि ज्यादा व्याजदरासह आयकरातही सूट मिळते.

गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पर्याय

पोस्ट ऑफिस स्मॉल सेविंग स्कीम या किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पर्याय मानला जातो. या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त व्याजदर मिळतो. पोस्ट ऑफिस बचत खात्यांसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदर हा दर तिमाहीनंतर बदलला जातो. दरम्यान जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान 500 रुपये जमा करुन अकाऊंट उघडता येते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटवरील व्याज दर हा दर महिन्याच्या 10 तारखेदरम्यान किंवा महिन्याच्या शेवटच्या दिवशी जमा होतो. यातून देखभाल शुल्क म्हणून 100 वजा केले जातात. जर खात्यातील शिल्लक शून्य झाली तर ते खाते आपोआप बंद करण्यात येते.

झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करण्याची सुविधा

वित्त मंत्रालयाने 9 एप्रिल 2021 रोजी पोस्ट ऑफिसमधील बचत बँक खात्याबाबत अधिसूचना जारी केली होती. यात कोणकोणत्या व्यक्ती झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करु शकतात, याबाबतची माहिती देण्यात आली होती. यात, कोणतीही सामान्य व्यक्ती जो कोणत्याही शासकीय कल्याणकारी योजनेचा नोंदणीकृत सदस्य असेल आणि पालकांद्वारे एखाद्या अल्पवयीन मुलाच्या बाबतीत ज्याचे नाव कोणत्याही शासकीय फायद्यासाठी नोंदवले गेले असेल ते त्याचा लाभ घेऊ शकतात.

(Post Office savings account interest earned in financial year is tax exempted Know the details)

संबंधित बातम्या : 

RBI कडून 14 बँकांना कोट्यवधींचा दंड, सरकारी ते खाजगी बँकांपर्यंतचा समावेश

विमा पॉलिसीमध्ये ‘बेनेफिशियल नॉमिनी’चा नवा नियम; याच व्यक्तींना मिळू शकतील नॉमिनीचे लाभ

ही टेक कंपनी यंदाच्या अखेरीस 500 लोकांना देणार नोकर्‍या, नेमकी पात्रता काय?