RBI: उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील भार हलका होणार?

RBI Repo Rate: केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली आहे. शुक्रवारी तुमचा ईएमआय कमी होणार की नाही याविषयीची आनंदवार्ता येण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडामोडी पाहता हा निर्णय सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

RBI: उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील भार हलका होणार?
आरबीआय रेपो दर
Image Credit source: गुगल
Updated on: Dec 03, 2025 | 1:14 PM

RBI MPC Meeting 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आजपासून बैठक होत आहे. ही बैठक शुक्रवारी 5 डिसेंबरपर्यंत चालेल. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत रेपो दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रेपो दर कपातीचा सपाटा लावण्यात आला. तर गेल्यावेळी मात्र रेपो दर कपातीला ब्रेक लागला. व्याज दर जैसे थे ठेवण्यात आले. पण यावेळी सर्वसामान्यांना, कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी तुमच्या कर्जाचा ईएमआय (EMI) कमी होणार की नाही याविषयीची आनंदवार्ता येण्याची शक्यता आहे.

SBI चा अहवाल सांगतो काय?

काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती रेपो दरात 25 आधारभूत पॉईंटवर कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण SBI च्या एका अहवालानुसार, सध्याची परिस्थिती तशी दिसत नाही. या अहवालानुसार जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP वाढ मजबूत दिसली. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता रेपो दरात कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाही. सोबतच या अहवालात माहिती दिल्यानुसार, जगातील अनेक अर्थव्यवस्था आपल्या रेपो दरात मोठा बदल केलेला नाही. रेपो दरात कोणताही बदल करताना दिसत नाही. त्यामुळे रेपो दर जैसेथे राहण्याचे संकेत हा अहवाल देत आहे.

रेपो दरात मोठी कपात

तर दुसरीकडे क्रेडीट रेटींग कंपनी CareEdge चा अहवाल वेगळाच दावा करत आहे. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात देशाचा राष्ट्रीय चलनवाढीचा दर दहा वर्षांच्या नीच्चांकी पातळीवर 0.3 टक्क्यांवर पोहचला आहे. आरबीआयचे उद्दिष्ट चार टक्के आहे. त्यापेक्षा चलनवाढीचा दर हा कमी आहे. त्यामुळे यावेळी व्याज दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहवालानुसार, राष्ट्रीय चलनवाढी नीच्चांकी स्तरावर असल्याने आणि दुसरीडे जीडीपीने झेप घेतल्याने रेपो दरात 0.25 टक्क्याची कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेपो दरात किती कपात?

आरबीआयने 2025 पासून सुरू केलेल्या रेपो दर कपातीचे मिशन जोमात चालवले.. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो दर 5.5 टक्क्यांवर आला. पण ऑगस्ट महिन्यात या दर कपात धोरणाला ब्रेक लावण्यात आला. त्यामुळे रेपो दर 5.5 टक्क्यांवर स्थिर आहे.