Reliance : रिलायन्स इंडस्ट्रीजने मारली बाजी, भारतातून ठरली सर्वोत्तम कंपनी, फोर्ब्सकडून शिक्कामोर्तब, या देशाच्या कंपन्यांचा यादीत बोलबाला..

| Updated on: Nov 06, 2022 | 4:14 PM

Reliance : भारतातील सर्वोत्तम कंपनी म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजने इतर सर्व कंपन्यांना पिछाडीवर टाकत पहिला क्रमांक पटकवला.

Reliance : रिलायन्स इंडस्ट्रीजने मारली बाजी, भारतातून ठरली सर्वोत्तम कंपनी, फोर्ब्सकडून शिक्कामोर्तब, या देशाच्या कंपन्यांचा यादीत बोलबाला..
रिलायन्सची जागतिक झेप
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) देशातील सर्वोत्तम कंपनी (India’s Best Employer) ठरली आहे. या कंपनीचे नाव जगातील 20 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये दाखल झाले आहे. प्रतिस्पर्धी अथवा इतर कंपन्यांना पिछाडीवर टाकत रिलायन्सने हे मान पटकावला आहे.

फोर्ब्सने जाहीर केलेल्या नामांकित कंपन्यामध्ये भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने रँकिंगमध्ये क्रमांक पटकावला. फोर्ब्सने वर्ल्ड्स बेस्ट एप्लॉयर रँकिंग 2022 ची नुकतीच घोषणा केली. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने झेंडा फडकावला.

फोर्ब्सच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने 20 वे स्थान पटकावले आहे. तर भारतातून कंपनीने पहिले स्थान पटकावले आहे. महसूल, फायदा आणि बाजारातील भांडवल या तीन मुद्यांवर कंपनीने फोर्ब्सच्या यादीत स्थान पटकावले आहे.

हे सुद्धा वाचा

फोर्ब्सच्या ग्लोबल रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे ती दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी. त्यानंतर अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, अल्फाबेट आणि अॅप्पल. अर्थात या यादीत सर्वाधिक दबदबा अमेरिकेतील कंपन्यांचा होता हे वेगळ सांगायला नको.

अमेरिकीतील कंपन्यांनी या यादीत त्यांचे स्थान पक्के केले आहे. या यादीतील पहिला क्रमांक सोडला तर पुढील सलग 11 कंपन्या अमेरिकन आहे. म्हणजे क्रमांक 2 ते 12 या सर्व कंपन्या अमेरिकन आहेत.

फोर्ब्सच्या यादीत 13 व्या स्थानी जर्मनीची ऑटोमोबाईल कंपनी बीएमडब्ल्यू ही आहे. त्यानंतर जगातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता, रिटेलर कंपनी अॅमेझॉन 14 व्या स्थानी तर फ्रासची स्पोर्टस् कंपनी डीकेथलॉन 15 व्या स्थानी आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रातील बाप कंपनी आहे. या कंपनीत सध्या 2,30,000 इतके कर्मचारी काम करतात. भारतातील सर्वात चांगली रँकिंग असलेली ही एकमेव कंपनी ठरलेली आहे.

कंपनीने जर्मनीतील मर्सिडीज बेंज, अमेरिकन कोका-कोला, जपानची ऑटो कंपनी होडा आणि यामाहा तर सऊदी अरबमधील अरामको कंपनीलाही मागे टाकले आहे. या सर्व कंपन्यांना मागे लोटत कंपनीने यादीत नाव पटकावले आहे.