कांदे-बटाटे-टोमॅटोच्या महागाईपासून दिलासा! केंद्राचं मोठं पाऊल, दिल्ली-मुंबईतील कांद्याचे दर काय?

| Updated on: Oct 17, 2021 | 10:57 PM

कांदा स्टॉक ऑगस्ट 2021 च्या अखेरीस 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर मंडईंमध्ये योग्य पद्धतीने सोडण्यात येत आहे. यामुळे केवळ कांद्याचे दर कमी होण्यास मदत होणार नाही, तर किमान साठवण तोटा देखील सुनिश्चित होईल. याचा परिणाम म्हणून 14 ऑक्टोबरला महानगरांमध्ये कांद्याची किरकोळ किंमत 42 ते 57 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली.

कांदे-बटाटे-टोमॅटोच्या महागाईपासून दिलासा! केंद्राचं मोठं पाऊल, दिल्ली-मुंबईतील कांद्याचे दर काय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली : कांदा, टोमॅटो आणि बटाट्याच्या किमती काही आठवड्यांपासून सातत्याने वाढत आहेत. तर या तीन गोष्टी देशातील बहुतेक घरांमध्ये सर्वाधिक वापरल्या जातात. अशा स्थितीत सर्वसामान्य लोक त्यांच्या किमती वाढल्याने खूप अस्वस्थ झालेत. त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईतून लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले. वास्तविक कांद्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने बफर स्टॉक जारी केलाय. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, टोमॅटो आणि बटाट्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कांद्याचे सरासरी घाऊक दर 30 रुपये प्रतिकिलो

कांदा स्टॉक ऑगस्ट 2021 च्या अखेरीस ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर मंडईंमध्ये योग्य पद्धतीने सोडण्यात येत आहे. यामुळे केवळ कांद्याचे दर कमी होण्यास मदत होणार नाही, तर किमान साठवण तोटा देखील सुनिश्चित होईल. याचा परिणाम म्हणून 14 ऑक्टोबरला महानगरांमध्ये कांद्याची किरकोळ किंमत 42 ते 57 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. त्याच वेळी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 37.06 रुपये किलो होती, तर सरासरी घाऊक दर 30 रुपये प्रति किलो होता.

चार महानगरांमध्ये कांद्याची किरकोळ किंमत

14 ऑक्टोबर रोजी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव चेन्नईमध्ये 42 रुपये, दिल्लीमध्ये 44 रुपये, मुंबईत 45 रुपये आणि कोलकातामध्ये 57 रुपये किलो होते. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने माहिती दिली. कांद्याचा बफर स्टॉक त्या राज्यांमध्ये सोडला जात आहे, जिथे किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत आणि किमती मागील महिन्याच्या तुलनेत वाढत आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्ली, कोलकाता, लखनौ, पटना, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूरच्या बाजारात एकूण 67,357 टन कांदा सोडण्यात आला.

संबंधित बातम्या

विजेचे संकट लवकरच संपेल का?, पूर्व भागातील वीजनिर्मिती 8 टक्क्यांनी वाढली

Bad Bank च्या मंडळात लवकरच अधिक संचालकांचा समावेश, खासगी बँकांमध्ये 49 टक्के हिस्सा

Relief from onion-potato-tomato inflation! What is the price of onion in Delhi-Mumbai?