Gold Crash Warning : सोनं-चांदी दणादण क्रॅश… जगातील सर्वात मोठ्या एक्सपर्टची मोठी वॉर्निंग, स्वत:ही…

प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जगातील सर्वात मोठ्या आर्थिक घसरणीचा इशारा दिला आहे, जी 2008 पेक्षाही भीषण असेल. त्यांच्या मते, महागाई आणि सरकारी धोरणांमुळे हे संकट येणार असून, त्यांनी सोन्या-चांदीसोबतच बिटकॉइन आणि इथेरियममध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ईटीएफऐवजी प्रत्यक्ष संपत्ती खरेदी करून या संकटातून मार्ग काढण्याचे कियोसाकीचे आवाहन आहे.

| Updated on: Nov 25, 2026 | 2:07 PM
1 / 6
रिच डॅड अँड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. सातत्याने पोस्ट करून गुंतवणुकीचा सल्लाही देत असतात. कियोसाकी यांनी पुन्हा एकदा नवीन पोस्ट करून वॉर्निंग दिली आहे. सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जगातील ही आजवरची सर्वात मोठी घसरण आहे. 2008पेक्षाही ही मोठी घसरण आहे, असं सांगतानाच आपण सोनं चांदी का खरेदी करत आहोत? याची माहितीही रॉबर्ट कियोसाकी यांनी दिली आहे.

रिच डॅड अँड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. सातत्याने पोस्ट करून गुंतवणुकीचा सल्लाही देत असतात. कियोसाकी यांनी पुन्हा एकदा नवीन पोस्ट करून वॉर्निंग दिली आहे. सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जगातील ही आजवरची सर्वात मोठी घसरण आहे. 2008पेक्षाही ही मोठी घसरण आहे, असं सांगतानाच आपण सोनं चांदी का खरेदी करत आहोत? याची माहितीही रॉबर्ट कियोसाकी यांनी दिली आहे.

2 / 6

रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या नव्या पोस्टमधून हा मोठा खुलासा केला आहे. मी खरे सोनं, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम खरेदी करत आहे. त्याचे ईटीएफ खरेदी करत नाही, असं कियोसाकी यांनी म्हटलं आहे. तसेच गोल्ड सिल्व्हर प्राइस क्रॅश होत असताना त्याच्या खरेदी मागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. या समस्येची सुरुवात फेडने होते. आणि ब्लॅक रॉक सारख्या विश्वाच्या इन्व्हेस्टमेंट बँक, आमच्याच पैशातून आमच्या संपत्तीची लूट करत आहे, असं रॉबर्ट कियोसाकी यांनी म्हटलं आहे.

3 / 6

आमचं सरकार काहीच मदत करत नाहीये. अमेरिकन ट्रेजरीचे नेते आणि कमकुवत नोकरशाह केवळ आपली नोकरी वाचवण्याची धडपड करत आहेत. ते केवळ दु:ख विकत आहेत, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या नोकरीला किंवा तुमच्या निवृत्तीला नाही. बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेची गोष्ट तर सोडूनच द्या. त्यामुळेच मी सोनं, चांदी, बिटकॉइन, इथेरियम, रिअल इस्टेट प्रॉपर्टी आणि तेल खरेदी करत आहे, असं कियोसाकी यांनी स्पष्ट केलं आहे.

4 / 6

सोनं चांदीच्या खरेदी करण्याचं कारण साांगतानाच त्यांनी ग्लोबल क्रॅश वॉर्निंगचाही इशारा दिला आहे. ट्रिलियन डॉलरचा अर्थ 1च्या पुढे 12 शून्य म्हणजे $1,000,000,000,000 आणि अमेरिका दर 90 दिवसात 1 ट्रिलियन डॉलर कमावत आहे. तर क्वाड्रिलियन (Quadrillion) चा अर्थ 1 च्या मागे 15 शून्य आणि डेरिव्हेटिव्स मार्केटला क्वाड्रिलियनमध्ये मोजलं जातं. जेव्हा 2008 मध्ये सब-प्राइम मॉर्गेज डेरिव्हेटिव्स मार्केट क्रॅश झालं होतं, तेव्हा संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था जवळपास बुडाली होती.

5 / 6

आशा आहे की मी चुकीचा आहे. पण माझं म्हणणं खरं ठरलं तर सोनं, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम मला अल्ट्रा रिच लोकांच्या कॅटेगिरीत घेऊन जातील, असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पैसा छापण्याचा मोठा काळ सुरू होत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

6 / 6

ज्या लोकांना पैश्यांच्या बाबत शिकायला आवडतं आणि जे लोक आपलं कुटुंब आणि बिझनेसच्या भागिदारीसाठी पावलं उचलतात अशा सकारात्मक आणि सक्रिय लोकांना भेटण्याची वेळ आली आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? तुमच्या जवळपासचे कॅशफ्लो क्लब शोधा किंवा स्वत:चा गेम घ्या किंवा स्वत:चा कॅशफ्लो क्लब खोला. तुम्हाला अधिक शिकायचे असेल तर तुम्ही नियमांचं पालन करा, असंही त्यांनी म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us