Rupee: रुपयाने डॉलरविरोधात दंड थोपाटले, तुम्हाला काय होईल फायदा?

| Updated on: Nov 15, 2022 | 11:18 PM

Rupee: रुपयाने डॉलरविरोधात दंड थोपटल्याने तुम्हाला नेमका काय फायदा होईल?

Rupee: रुपयाने डॉलरविरोधात दंड थोपाटले, तुम्हाला काय होईल फायदा?
रुपयाच्या मजबूतीचा फायदा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : रुपयाने (Rupee) बऱ्यात दिवसानंतर डॉलरला (Dollar) जोरदार धोबीपछाड दिली आहे. विशेष म्हणजे इतर चलन (Currency) घसरणीच्या स्तरावर असताना रुपयाची कामगिरी वाखण्याजोगी आहे. पहिल्यांदाच रुपयाने डॉलरविरोधात दंड थोपाटले आहे. त्याचा तुम्हाला काय फायदा होईल?

रुपयाने दुसऱ्यांदा जोरदार पुनरागमन केले आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने 17 पैसे मजबूती दर्शविली आणि रुपया 81.11 वर बंद झाला. देशातंर्गत बाजारातील आर्थिक मोर्चावर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

रुपयाच्या मजबूती मागे दोन घडामोडी प्रमुख आहेत. त्यात परदेशी गंगाजळी वाढत आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून पैशांचा ओघ सुरु आहे. तर कच्च्या तेलाच्या किंमतीतही प्रचंड घसरण हे ही एक कारण आहे. या दोन्ही घटकांचा फायदा आर्थिक आघाडीवर मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

डॉलरपेक्षा रुपयाची मजबूती सर्वसामान्य नागरिकांसाठीही फायदेशीर ठरेल. आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतो. रुपयाच्या मजबूतीमुळे आयातीवरील खर्च वाचणार आहे. बिल कमी होईल आणि अनेक वस्तू स्वस्तात आयात करता येतील.

भारत कच्चे तेल आणि खाद्यतेल आयात करतो. त्यासाठी भारताची मोठी गंगाजळी खर्ची पडते. रुपयाच्या मजबूतीमुळे आता हे दोन्ही घटक स्वस्तात आयात करता येईल. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांचा तोटा कमी होऊ शकतो.

भारत डाळींची मोठ्या प्रमाणात आयात करतो. डॉलरच्या तुलनेत रुपयांची ही मजबूती देशातंर्गत डाळीच्या किंमती कमी होण्यासाठी मदत करेल. तसेच खाद्यतेलाच्या किंमतीही अजून कमी होण्याची शक्यता आहे.

रुपया मजबूत झाल्याने किरकोळ महागाई दर आणखी घसरण्याची दाट शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरला आहे. मागील तीन महिन्यांचा रेकॉर्ड त्यांनी बदलून टाकला. नोव्हेंबर महिन्यात तर तो 6 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे.

रुपयाच्या मजबूतीचा खरा फायदा शेअर बाजारात दिसून येत आहे. बाजारात चैतन्य परतले आहे. तर परदेशी गुंतवणूकदारांनीही पुन्हा बाजाराकडे मोर्चा वळविला आहे. अनेक कंपन्यांमध्ये परदेशी पाहुणे पैसा ओतत आहेत. त्यामुळे बाजार नवीन उच्चांकाकडे आगेकूच करत आहे.