AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नावरुन परतत असताना बसला अपघात, एकजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी

लग्न लावून परत येत असताना वरातीच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करत असताना बस झुडुपात शिरल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

लग्नावरुन परतत असताना बसला अपघात, एकजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी
accident
| Updated on: Mar 13, 2026 | 3:34 PM
Share

लग्न समारंभ आटोपून घराकडे येत असलेल्या वऱ्हाडाच्या खाजगी बसला अपघात झाल्याने त्यात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे गोंदियाजवळील कारंजाजवळ घडली आहे. या बसचा चालक ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटल्याने बस शेजारील झुडपात शिरल्याने बसच्या पुढील भागाची नासधुस झाली. यातील चालकाने बसमधून उडी मारुन घटना स्थळावरुन पाबोरा केला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चोपा- मोहाडी येथील वरखडे कुटुंबातील मंडळी लग्न सोहळा आटोपून येत होती. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी मॅकेपार येथे विवाहासाठी ही वऱ्हाडी मंडळी गेली होती. रात्री लग्न सोहळा आटोपून ही मंडळी परतत असताना पहाटे गोंदियातील कारंजा येथे बस चालकाचे नियंत्रण ओव्हरटेक करताना सुटले आणि ही बस जंगलातील झुडुपात घुसली आणि अनेक झाडांना धडका देत ही बस तशीच काही किलोमीटर आत घुसली, त्यावेळी चालकाने उडी मारुन स्वत:चे प्राण वाचवले आणि तो पळून गेला. या भीषण अपघातात सोनू घनश्याम उईके (वय २७, रा. वाडी, नागपूर ) याचा मृत्यू झाला. तर इतर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

gondia bus accident

gondia bus accident

जखमींना खिडकीतून बाहेर काढले

ही भरधाव बस ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात शिरली. यामुळे झाडांना धडकून या बसच्या समोरील काचा तुटल्या आणि अनेक जण त्यामुळे गंभीर जखमी झाले. यात समोर बसलेल्या सोनू घनश्याम उईके याचा मृत्यू झाला. तर चालकाने उडी मारुन पयालन केले. या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी काही जणांना खिडकीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत झाडाझुडुपांना ठोकर देत बस काही किमी धावल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर