Rupee Record Low | रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी; 78.85 रुपयांच्या निचांकी पातळीवर, महागाई वाढण्याची भीती

| Updated on: Jun 28, 2022 | 7:44 PM

Rupees Low Down : घसरणीच्या मार्गावर असणा-या रुपयाने आपटी खाल्ली. रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी उडाली. रुपया 78.85 रुपयांच्या निचांकी पातळीवर पोहचला आहे. रुपया 80 रुपयांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिश्यावर महागाईचा बोजा पडणार आहे.

Rupee Record Low | रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी; 78.85 रुपयांच्या निचांकी पातळीवर, महागाई वाढण्याची भीती
डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण
Image Credit source: TV9marathi
Follow us on

महागाईने सर्वसामान्यांच्या नाकात दम आणला आहे. सरकारचे महागाई (Inflation)आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नाला रुपयाने (Rupee) दे धक्का दिला. गेल्या पाच दिवसांपासून रुपयाची निसरड्या रस्त्यावरुन वाटचाल सुरु होती. डॉलर (Dollar) मजबूत होत असल्याने अखेर या वाटचालीत थकलेल्या रुपयाने चांगलीच कच खाल्ली.रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी (Historical fall) उडाली आहे. रुपया 78.85 रुपयांच्या निचांकी पातळीवर पोहचला आहे. रुपया 80 रुपयांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.अमेरिकन फेडरल बँकेने (American Federal Bank) महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदार ही भारतीय शेअर बाजारातून पळ काढत आहेत. या सर्व घडामोडींचा सर्वसामान्य भारतीयांच्या खिश्यावर परिणाम होणार आहे. इंधनाच्या किंमती (Petrol Diesel Price) पुन्हा भडकल्यास सर्वच वस्तूंच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण

इंटरबँक करन्सी एक्सचेंज मार्केटमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत 15 पैशांनी घसरला आणि 78.51 रुपयांवर उघडला. परंतु, परदेशी गुंतवणुकदारांनी जोरदार विक्री सुरु केल्याने रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. परिणामी महागाईचा भडका उडण्याची भीती आहे. त्यातच रुपयाने पटकी खाल्याने आणि तो याही पेक्षा खालच्या अंगाला घसरणार असल्याने सरकारपुढे महागाई आणि रुपयाचे अवमूल्यन थांबवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

हे सुद्धा वाचा

डॉलरच्या मजबुतीने हे होणार परिणाम

इंधन दराचा भडका

पेट्रोल-डिझेलसाठी भारत आखाती देशावर अवलंबून आहे. इंधनाची गरज भागवण्यासाठी भारत 80 टक्के आयात करतो. सरकारी कंपन्या डॉलरमध्ये कच्चे तेल खरेदी करतात. रुपयाच्या घसरणीमुळे या आयातीसाठी कंपन्यांना अधिकचा दाम मोजावा लागणार आहे आणि ही महसूली तूट भरुन काढण्यासाठी इंधनाचे दर वाढवावे लागतील. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढण्याची भीती आहे.

खाद्यतेल ही महागणार

खाद्यतेलाचे भाव आधीपासूनच भडकलेले आहेत. मलेशियाने पामतेलावर निर्यात निर्बंध घातल्याने मध्यंतरी तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. निर्यात बंदी उठली असली तरी पामतेलाचा व्यवहार हा डॉलरमध्ये होतो. परिणामी खाद्यतेलासाठी पुन्हा जादा दाम मोजावे लागतील. हा कच्चा माल महागल्याने भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो.

या क्षेत्रावरही होणार परिणाम

ज्या ठिकाणी डॉलर चलनाशी थेट संबंध येतो. त्या प्रत्येक क्षेत्रावर या घडामोडीचा दुरगामी परिणाम दिसून येईल. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक पार्ट्स हे परदेशातून आयात होतो. तर लॅपटॉप, टीव्ही आणि इतर होम अपलायन्ससाठी ही काही पार्ट्स परदेशातून आयात करण्यात येतात. मोबाईलचे काही पार्टस् ही बाहेरुन येतात. हा व्यवहार डॉलरशी संबंधित असल्याने त्यांच्या किंमती वाढणार आहे. परदेशातील शिक्षण ही यामुळे वाढेल. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी आता विद्यार्थ्यांना अधिक रक्कम उभी करावी लागणार आहे. ज्वैलरी आणि डायमंड उद्योगावरही याचा परिणाम पहायला मिळू शकतो.