देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने सांगितली या 3 बँकांची नावे

Safest Bank in India : तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे बँकेत पैसे असतील. मात्र अनेकांना नेहमी भीती असते की आपले पैसे सुरक्षित आहेत की नाहीत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती दिली आहे.

देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने सांगितली या 3 बँकांची नावे
safest bank of India
| Updated on: Dec 03, 2025 | 10:50 PM

भारतात अनेक बँका आहेत, यातील काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे बँकेत पैसे असतील. मात्र अनेकांना नेहमी भीती असते की आपले पैसे सुरक्षित आहेत की नाहीत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती दिली आहे. या बँकांमध्ये तुमचे पैसे असले तर तुम्हाला कोणताही धोका नाही. या बँका कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँकांची नावे जाहीर केली आहेत. बँकिंग भाषेत या बँकाना “डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स” (D-SIBs) म्हणतात. या तीन बँका भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्या बुडणार नाहीत किंवा दिवाळखोर होणार नाहीत असं आरबीआयने म्हटलं आहे. कारण या बँका इतक्या मोठ्या आहेत की बँका बुडाल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.

या तीन बँका महत्त्वाच्या का आहेत?

तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की, सरकारी बँका या सर्वात सुरक्षित असतात, मात्र आरबीआयच्या यादीत 3 पैकी दोन बँका या खाजगी क्षेत्रातील आहेत. या तिन्ही बँकांचे देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. छोटीशी चूक झाली तरीही याचा परिणाम शेअर बाजारापासून सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे आरबीआय आणि भारत सरकारने या भविष्यात या बँकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमचे पैसे या 3 बँकांमध्ये असतील तर ते पूर्णपणे सुरक्षित असणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, या तिन्ही बँकांना इतर बँकांपेक्षा जास्त रोख राखीव निधी किंवा भांडवल जवळ ठेवावे लागते. याला ‘कॉमन इक्विटी टियर 1’ (CET 1) असे म्हणतात. हा आपत्कालीन निधी आहे जो संकटाच्या वेळी वापरता येतो. त्यामुळे या बँकांच्या कामकाजावर परिणाम होत नाही किंवा नागरिकांच्या पैशांवर गदा येत नाही. त्यामुळे या बँकांमध्ये पैसे असणे सर्वात सुरक्षित मानले जाते.