SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा, घरबसल्या वारसदाराची नोंदणी करण्याची सुविधा सुरु

| Updated on: Jun 15, 2021 | 10:41 PM

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या ग्राहकांची सर्वात मोठी समस्या सोडवली आहे. SBI nominee registration

SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा, घरबसल्या वारसदाराची नोंदणी करण्याची सुविधा सुरु
एसबीआयने एक विशेष ठेव योजना एफडी किंवा मुदत ठेवमध्ये ऑफर केली, ज्या अंतर्गत सर्व ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज द्यावे, असे सांगितले गेले. प्लॅटिनम डिपॉझिट नावाची ही नवीन योजना फक्त काही दिवसांसाठी आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार ही योजना 14 सप्टेंबर रोजी बंद होईल. SBI ने म्हटले आहे, 'स्वातंत्र्याची 75 वी वर्ष साजरी करण्याची वेळ आली आहे. एसबीआयमध्ये मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींवर विशेष लाभ दिले जात आहेत. ही ऑफर फक्त 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध आहे.
Follow us on

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या ग्राहकांची सर्वात मोठी समस्या सोडवली आहे. आता एसबीआयचे ग्राहक घरी बसून बँक खात्यामध्ये वारसदार व्यक्तीच्या नावाची नोंदणी करू शकतील. स्टेट बँकेच्या ग्राहकांना यापूर्वी त्यांना बँकेच्या शाखेत फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, स्टेट बँकेने ही प्रक्रिया ऑनलाईन केलीआहे. एसबीआयने केलेल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँकेच्या ऑनलाईन एसबीआय (Online SBI) किंवा योनो लाइट (YONO Lite) अ‌ॅपचा वापर करुन वारसदारांची माहिती भरु शकता. (SBI started nominee registration process for your account using SBI YONO Lite or Online SBI service)

ग्राहकांनी ताण घेऊ नये

एसबीआयकडून एखाद्या ग्राहकाच्या खात्याच्या खात्यात वारसदाराची माहिती भरली नसेल तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. हे काम आता घरी बसून करता येईल. याशिवाय ही सुविधा एसबीआयच्या प्रत्येक शाखेतही उपलब्ध असेल असं देखील सांगण्यात आलं आहे. स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार जर तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे बचत किंवा चालू खाते ,मुदत किंवा रिकरिंग ठेव खाते असेल तर नॉमिनी म्हणजेच वारसादाराची घरबसल्या नोंदणी करता येईल.

YONO LITE अ‍ॅप वरुन कशी नोंदणी करावी?

जर तुम्ही स्टेट बँकेचे YONO LITE अ‍ॅप वापरत असल्यास त्यावर प्रथम लॉग इन करावे लागेल. अ‌ॅप ओपन केल्यानंतर मुख्यपृष्ठ बटणावर क्लिक करा आणि सेवा विनंती पर्याय निवडा. सेवा विनंतीवर क्लिक केल्यावर, जे पेज उघडेल तिथे ऑनलाइन नामनिर्देशन म्हणजेच वारसदाराची माहिती भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला खात्याचा तपशील निवडावा लागेल आणि नॉमिनीची म्हणजेच वारसदाराची संपूर्ण माहिती भरावी लागेल. बँक ग्राहकाला इथं त्यानं वारसदार म्हणून माहिती भरलेल्या व्यक्ती सोबतचं नातं लिहावं लागते. जर आधी एखाद्या व्यक्तीची वारसदार म्हणून नोंद असेल तर ती रद्द करावी लागते. त्यांतर नव्या व्यक्तीची माहिती भरता येते.

नेट बँकिंगद्वारे कशी माहिती अपडेट करायची

तुम्ही एसबीआय नेट बँकिंग वापरत असाल तर तुम्ही एसबीआय वेबसाइट onlinesbi.com ला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला रिक्वेस्ट अँड इनक्वायरी या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर बरेच पर्याय उघडतील. ज्यामधून ऑनलाइन नामनिर्देशनाचा पर्याय निवडावा लागेल. जर तुमची स्टेट बँकेत अधिक खाती असतील तर तुम्ही योग्य ते खाते निवडून त्यामध्ये वारसदाराची माहिती अपडेट करु शकता. माहिती भरल्यानंतर त्याची पडताळणी करुन ते अपडेट केले जाते.

वारसदाराची माहिती भरणं का गरजेचे?

खातेधारकानं बँक खातं उघडताना नामनिर्देशन म्हणजेच वारसदाराची माहिती भरणे फार आवश्यक असते. जर खातेदाराचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर त्या खात्यात असलेल्या रकमेवर नामनिर्देशन केलेल्या व्यक्तीचा पूर्ण हक्क असतो. जर खातेधारकानं वारसदाराची माहिती भरली नाही तर त्याच्या खात्यावरील रक्कम बँकेकडे राहते. एका अंदाजानुसार मृत्यू झालेल्या अशा खातेदारांच्या नावे कोट्यवधी रुपये बँकांमध्ये जमा आहेत. परंतु त्यांच्या खात्यात नामनिर्देशित नसल्यामुळे बँक ग्राहकांच्या कुटूंबाला ही रक्कम मिळत नाही.

संबंधित बातम्या:

SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण, लाभ घेण्यासाठी काय करायचं?

परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना मोठा दिलासा, 30 जूनपर्यंत बँकामध्ये ‘हे फॉर्म’ ऑफलाईन भरता येणार

SBI started nominee registration process for your account using SBI YONO Lite or Online SBI service