AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण, लाभ घेण्यासाठी काय करायचं?

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरणार्‍या सर्व जनधन खातेदारांना बँकेमार्फत विशेष सुविधा देत आहे.

SBI कडून 'या' खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण, लाभ घेण्यासाठी काय करायचं?
sbi
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 7:38 PM
Share

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरणार्‍या सर्व जनधन खातेदारांना बँकेमार्फत विशेष सुविधा देत आहे. आता त्यांना स्टेट बँकेकडून 2 लाख रुपयांपर्यंतचं मोफत अपघाती विमा संरक्षण मिळू शकेल. या योजनेचा लाभ जनधन खाते असलेल्या लोकांना देण्यात येणार आहे. (State Bank of India SBI offers free accidental cover of 2 lakh for jan dhan account RuPay atm card holders)

एसबीआयकडून ग्राहकांना दिलं जाणार अपघात विमा संरक्षण त्यांच्या जनधन खाते उघडण्याच्या कालावधीवर अवलंबून असेल. म्हणून, ज्या ग्राहकांचे प्रधानमंत्री जनधन ख खाते 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडले असेल त्यांना RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळेल. तर 28 ऑगस्ट,2018 नंतर जारी केलेल्या रुपे कार्डवर २ लाखांपर्यंतचा अपघाती विमा उपलब्ध होईल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना

आर्थिक दुर्बल घटकांना परवडणाऱ्या पद्धतीने आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाते, पैसे, पत, विमा, निवृत्तीवेतनाची सुविधा मिळावी या उद्देशाने पंतप्रधान जन धन योजना सुरू केली गेली. यात कोणतीही व्यक्ती जन धन खाते ऑनलाइन उघडू शकते किंवा बँकेला (केवायसी) कागदपत्रे देऊन भेट देऊ शकते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमचे बचत खाते जन धनमध्ये रूपांतरित देखील करू शकता. जनधन खात्यांसाठी बँका RuPay Debit कार्ड ग्राहकांना देतात. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.

अपघात विमा योजनेचा लाभ कुणाला मिळतो?

जन धन खातेधारकांना Rupay Debit डेबिट कार्ड अंतर्गत अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी त्यानं अपघात होण्याच्या तारखेपूर्वी 90 दिवसांच्या कालावधी त्यानं बँकअंतर्गत किंवा आंतर बँक आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार केले असावेत. ही अट पूर्ण झाल्यावर विम्याच्या रक्कमेचा दावा आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर देण्यात येईल.

कोणती कागदपत्रं लागतात?

विमा दावा अर्ज, मृत्यू प्रमाणपत्राची मूळ किंवा साक्षांकित प्रत, अपघाताची माहिती देणारा पोलिसांचा अहवाल किंवा साक्षांकित प्रत, मृत्यू दसुऱ्या कारणानं झाल्यास पोस्टमॉर्टम रिपोर्ट, डेबिट कार्ड धारकाचं आधार कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी, त्या अधिकाऱ्याचं नाव आणि ईमेल आयडी आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

पॅनकार्ड हरवलंय चिंता करु नका, इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर अर्ज करा, 10 मिनिटांत अडचण दूर

नोकरदार, मजुरांसाठी मोठी बातमी, सामाजिक सुरक्षा संहिता लवकरच लागू होणार, श्रमिकांना काय फायदा?

(State Bank of India SBI offers free accidental cover of 2 lakh for jan dhan account RuPay atm card holders)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.