दसऱ्याच्या तोंडावर SBI चा मोठा निर्णय, ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला

| Updated on: Oct 23, 2020 | 9:39 AM

एसबीआय (SBI-State Bank of India) ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ऐन दसऱ्याच्या तोंडावर बँकेने मोठा बदल केला आहे.

दसऱ्याच्या तोंडावर SBI चा मोठा निर्णय, ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला
Follow us on

नवी दिल्ली : देशातल्या सगळ्या मोठी सरकारी बँक एसबीआय (SBI-State Bank of India) ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ऐन दसऱ्याच्या तोंडावर बँकेने मोठा बदल केला आहे. आता ओटीपी टाकल्याशिवाय तुम्हाला पैसै काढता येणार नाहीत. नव्या नियमानुसार, आता तुम्हाला 10 हजार रुपये कॅश काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे. म्हणजे विना ओटीपी तुम्ही बँकेतून पैसे काढू शकत नाही. (sbi state bank of india set a new rules for atm cash withdrawal)

स्टेट बँकेने या आधीच हा नियम लागू केला होता. 18 सप्टेंबरपासून हा नियम 24 तासांसाठी लागू करण्यात आला होता. यापूर्वी, एसबीआयने 1 ऑक्टोबरपासून एसबीआय बँकिंग नियमांमध्ये ( SBI Banking Rules ) परदेशात पैसे पाठवण्याचे नियम बदलले होते. यानुसार आता ग्राहकांना परदेशात व्यवहार करण्यासाठी कर ( Tax ) भरावा लागतो. म्हणजेच ग्राहकांना परदेशात पैसे पाठवण्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागतात.

बँक खात्यामध्ये नाहीत पैसे, तरीही करू शकता UPI पेमेंट, वाचा कसे?

SBI ने केलं महत्त्वाचं ट्वीट
SBI ने यासंबंधी एक ट्वीट करत नव्या नियमांची माहिती दिली आहे. SBI च्या ट्विटनुसार, आतापासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना वन टाइम पासवर्ड (OTP) टाकावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नियम आता 24 तासांसाठी लागू करण्यात आला आहे. (sbi state bank of india set a new rules for atm cash withdrawal)

याआधी 12 तासांसाठी होता नियम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओटीपी प्रक्रिया आधी रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजल्यापर्यंत सुरू करण्यात आली होती. यामध्ये रक्कम टाकल्यानंतर ओटीपी स्क्रीन उघडेल आणि तिथे तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार करणं शक्य होणार आहे.

फक्त 5 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय, प्रत्येक महिन्याला कमवाल बक्कळ पैसा

बँकेने का लागू केला नियम?
देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना ऑनलाइन घोटाळेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नवीन नियमानंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला एटीएम स्क्रीनवरील रकमेसह ओटीपी स्क्रीनही दिसेल. ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल तो टाकल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

(sbi state bank of india set a new rules for atm cash withdrawal)