SHARE MARKET: घसरणीच्या सत्राला ब्रेक, सेन्सेक्स 462 अंकांनी वधारला; गुंतवणुकदारांच्या खिश्यात 5.42 लाख कोटी

| Updated on: Jun 24, 2022 | 11:53 PM

सेन्सेक्स 462 अंकाच्या तेजीसह 52,727.98 स्तरावर बंद झाला. तर, निफ्टी 143 अंकांच्या वाढीसह 15699 च्या टप्प्यावर बंद झाला. सेन्सेक्स वरील 30 पैकी 23 शेअर वधारले.

SHARE MARKET: घसरणीच्या सत्राला ब्रेक, सेन्सेक्स 462 अंकांनी वधारला; गुंतवणुकदारांच्या खिश्यात 5.42 लाख कोटी
शेअर बाजार
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली- जागतिक अर्थपटलावरील सकारात्मक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसून आला. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात तेजीचं चित्र पाहायला मिळालं. सेन्सेक्स 450 अंकाहून अधिक तेजीसह वधारला आणि निफ्टी 15700 च्या टप्प्यावर बंद झाला. आजच्या व्यवहारादरम्यान सर्वाधिक खरेदीचं चित्र पाहायला मिळालं. बँक आणि फायनान्शियल्स शेअर्स मध्ये सर्वाधिक तेजी राहिली. निफ्टी वर दोन्ही निर्देशांक 1.5 टक्क्यांच्या तेजीसह वधारले. ऑटो, मेटल आणि एफएमसीजी निर्देशांक (Auto and Metal Index) 1.25- 2 टक्क्यांच्या वधारणीसह बंद झाले. सेन्सेक्स 462 अंकाच्या तेजीसह 52,727.98 स्तरावर बंद झाला. तर, निफ्टी 143 अंकांच्या वाढीसह 15699 च्या टप्प्यावर बंद झाला. सेन्सेक्स वरील 30 पैकी 23 शेअर वधारले. आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये एम अँड एम M&M, इंड्सइंड बँक INDUSINDBK, बजाज फायनान्स BAJFINANCE, एचयूएल HUL, आयसीआयसीआय बँक ICICIBANK, भारती एअरटेल BHARTIARTL, रिलायन्स RELIANCE, टाटा स्टील TATASTEEL आणि एचडीएफसी HDFC स्टॉक्स समाविष्ट आहे.

वधारणीचा आठवडा-

दोन आठवड्यांच्या सलग घसरणीनंतर चालू आठवड्यात शेअर बाजारात तेजी नोंदविली गेली. चालू आठवड्यात सेन्सेक्स मध्ये 2.66% वाढ नोंदविली गेली. शेअर्स वाढीच्या अंकाच्या आलेखात 1367 अंकांची भर पडली. गेल्या आठवड्यात कंपन्यांचा मार्केट कॅप 236.77 लाख कोटींवर होता. चालू आठवड्यात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत तब्बल 5.42 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदविली गेली.

बँक शेअर्समध्ये खरेदी

आजच्या व्यवहारादरम्यान बँकिंग शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी वर बँक निर्देशांक 1.75 टक्के तेजी नोंदविली गेली. बँक ऑफ बडौदा BANKBARODA, इंड्सइंड बँक INDUSINDBK, आयसीआयसीआय बँक ICICIBANK, फेडरल बँक FEDERALBNK, एचडीएफसी बँक HDFCBANK, कोटक बँक KOTAKBANK च्या शेअर्स मध्ये 3.5 टक्के तेजी नोंदविली गेली

हे सुद्धा वाचा

IT शेअर्समध्ये विक्री

आजच्या व्यवहारादरम्यान IT शेअर्समध्ये विक्रीचा जोर राहिला. निफ्टी वर IT इंडेक्स टक्क्यांनी घसरला. माईंडट्री MINDTREE, इन्फोसिस INF, टेकएम TECHM आणि टीसीएस TCS घसरणीसह बंद झाले.

FII आणि DII डाटा

विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणुकीची आकडेवारी समोर आली आहे. फॉरेन इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्सने (FIIs) शेअर बाजारातून 2319.06 कोटी रुपयांचा ओघ राहिला. तर डोमेस्टिक इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्सने (DIIs) शेअर बाजारात 2438.31 रुपयांची गुंतवणूक केली.