SHARE MARKET: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 568 अंकांनी गडगडला; एलआयसी गुंतवणुकदारांची निराशा

| Updated on: Jun 07, 2022 | 8:42 PM

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Indian Life Corporation) शेअर्समध्ये सलग सहाव्या सत्रात घसरण झाली. एलआयसीचा शेअर 3.13 टक्क्यांच्या घसरणीसह 753 रुपयांच्या टप्प्यांवर बंद झाला. आजच्या व्यवहाराच्या दरम्यान 52 आठवड्याच्या नीच्चांकी स्तरावर 752 रुपयांच्या स्तरावर पोहोचला.

SHARE MARKET: घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 568 अंकांनी गडगडला; एलआयसी गुंतवणुकदारांची निराशा
घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 568 अंकांनी गडगडला
Image Credit source: facebook
Follow us on

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (Monetary policy meeting) बैठकीपूर्वीच शेअर बाजारात घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज (मंगळवार) सेन्सेक्स 568 अंकांच्या घसरणीसह 55107 वर पोहोचला आणि निफ्टी 153 अंकांच्या घसरणीसह 16416 च्या टप्प्यावर बंद झाला. टॉप-30 शेअर्सपैकी चार शेअर तेजीसह आणि अन्य 26 शेअर घसरणीसह बंद झाले. एनटीपीसी, मारुती सुझूकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि भारती एअरटेलच्या शेअरमध्ये घसरण झाली. टायटन, डॉ.रेड्डी (Dr.Reddy), एल अँड टी, हिंदुस्थान यूनिलिव्हर शेअर्समध्ये 3 ते 4.5 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविली गेली. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Indian Life Corporation) शेअर्समध्ये सलग सहाव्या सत्रात घसरण झाली. एलआयसीचा शेअर 3.13 टक्क्यांच्या घसरणीसह 753 रुपयांच्या टप्प्यांवर बंद झाला. आजच्या व्यवहाराच्या दरम्यान 52 आठवड्याच्या नीच्चांकी स्तरावर 752 रुपयांच्या स्तरावर पोहोचला.

रेपो दरात वाढ?

शेअर बाजारातील घसरणीवर भाष्य करताना जियोजित फायनान्शियल्स रिसर्च हेड विनोद नायर यांच्या मते गुंतवणुकदारांच्या नजरा आरबीआयच्या पतधोरण बैठकीकडं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समीक्षा समितीच्या बैठकीला कालपासून आजपासून सुरुवात झाली आहे. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आर्थिक धोरणात फेररचना करण्याच्या तयारीत असल्याचे मत अर्थजाणकार नायर यांनी व्यक्त केलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात फेररचना करण्याचं संकेत यापूर्वीच दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक धोरण बैठकीवेळी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थतज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार रेपो दरात 0.35-0.50 टक्क्यांपर्यंत अधिक वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

घसरणीचं सत्र थांबेना

भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. काल (सोमवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण नोंदविली गेली. काल सेन्सेक्स 94 अंकांच्या घसरणीसह 55675 अंकावर बंद झाला होता. निफ्टीत 15 अंकांच्या घसरणीसह 16569 च्या स्तरावर पोहोचला होता. आज टॉप-30 मधील 9 शेअर तेजीसह आणि उर्वरित 21 शेअर घसरणीसह बंद झाले होते.

व्याजदरात वाढ

मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील कामगिरीवर परिणाम झाला आहे. अन्य बँकांसोबत रिझर्व्ह बँक देखील व्याजदरात वाढ करण्याच्या भूमिकेत आहे.