Sim card cloning : सीम क्लोन करून कशी फसवणूक केली जाते?; फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

| Updated on: Jul 22, 2022 | 2:20 AM

सायबर फसवणूक (Cyber ​​fraud) टाळण्यासाठी सावधगिरी हाच सर्वात मोठा उपाय आहे. पोलीस आणि सायबर तज्ज्ञ नेहमी फोन लॉक करण्याचा सल्ला देतात. तसेच ई मेल आणि सोशल मीडियाचे सर्व पासवर्डही वेळोवेळी बदलण्याचा सल्ला देतात.

Sim card cloning : सीम क्लोन करून कशी फसवणूक केली जाते?; फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
Follow us on

पुण्यात राहणाऱ्या रोहनच्या मोबाईलचे (Mobile) नेटवर्क सारखे येत जात होते. सुरुवातीला त्यानं फारसं लक्ष दिलं नाही मात्र एके दिवशी अचानक पूर्ण नेटवर्क गेलं. तरीदेखील त्यानं लक्ष दिलं नाही. एके दिवशी रोहन काही कामानिमित्त बँकेत (Bank) गेला. त्यावेळी त्याच्या खात्यातील सर्व रक्कम दुसऱ्याच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाल्याचं निदर्शनास आलं. लगेच त्याने पोलिसांशी संपर्क साधला. तपास केल्यानंतर त्याचं सीम क्लोन (Sim card clon) झाल्याचं समजलं. फसवणूक करणाऱ्यांनी बँकेचे खाते हॅक करण्यासाठी सीम क्लोन केलं होतं.रोहनप्रमाणेच अनेक जणांची अशाप्रकारे फसवणूक केली जाते.विशेषतः ग्रामीण भागात राहणारे लोक अशा जाळ्यात नेहमी सापडतात. आपली फसवणूक होतेय हे त्यांना समजत नाही. अशा प्रकरणात सर्वसाधारणपणे काही प्रश्न उभे राहतात.एक म्हणजे रोहनसारख्या लोकांची निवड करून कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते आणि ते कसे फसवणुकीला बळी पडतात. दुसरे म्हणजे ही संपूर्ण घटना कशी घडते आणि तिसरे म्हणजे या घटना कशा टाळता येऊ शकतात? याची माहिती आज आपण घेणार आहोत.

बनावट कॉल सेंटर

अशा प्रकारची फसवणूक कोणतीही एकटी दुकटी व्यक्ती करू शकत नाही त्यांची एक टोळी असते. बनावट कॉल सेंटर देखील हेच काम करत असतात. एका डार्क वेबवरून तुमची माहिती काढली जाते. इतर लोक फोन वर विविध ऑफर देतात आणि ओटीपी मागतात. तसेच काही जण KYC करण्यासाठी OTP सांगायला लावतात. काही जण सोशल प्रोफाइल देखील स्कॅन करतात आणि इतर जण तुमच्या बँकेच्या डिटेल्सची माहिती मिळवतात. या सर्व घटना तुमच्या पाठीमागे होत असतात मात्र, दुर्देवानं याची तुम्हाला कल्पना देखील येत नाही.

अशी होते फसवणूक

तुमचे बँक खाते हे विविध प्रकारे हॅक केले जाऊ शकते. म्हणजे या टोळीतील सदस्य तुमचे बनावट आधार कार्ड बनवून तुमचे सीम हरवल्याची तक्रार पोलिसांना देतात. या आधारे टेलिकॉम ऑपरेटरकडून नवीन सीम घेतलं जातं. परंतु या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येण्याआधीच तुमच्या खात्यातील रक्कम लंपास होते.काही वेळेस PAYTM, बँक अधिकारी किंवा RO वॉटर प्यूरिफायर कंपनीकडून बोलत असल्याची बतावणी करण्यात येते. तुम्हाला KYC करायला सांगतात. त्यानंतर लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला सांगितले जाते. लिंक ओपन करताच तुमच्या बँक खात्याचे सर्व डिटेल्स समोरच्याला मिळतात.

हे सुद्धा वाचा

फसवणुकीपासून कसं वाचावं?

सायबर फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी हाच सर्वात मोठा उपाय आहे. पोलीस आणि सायबर तज्ज्ञ नेहमी फोन लॉक करण्याचा सल्ला देतात. तसेच ई मेल आणि सोशल मीडियाचे सर्व पासवर्ड वेळोवेळी बदलण्याचा सल्लाही देतात. नेट बँकिंग,क्रेडिट कार्डचे डिटेल्स कधीच कोणाशी शेअर करू नका. तुमचा कोणताही पासवर्ड मेल वर ठेऊ नका. लॉटरी, हॉलिडे पॅकेज , KYC असे कॉल्स टाळा.असा कॉल आला तर त्यांना आपले बँकेचे डिटेल्स शेअर करू नका ही सर्व सावधगिरी बाळगल्यासच तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.