Stock market updates : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 350 अकांनी वधारला, निफ्टी 16350 अंकांवर

आज शेअर बाजारात तेजी दिसत असून, पहिल्याच सत्रात सेन्सक्स 350 अकांनी वधारला आहे. तर दुसरीकडे एलआयसीच्या शेअर्समध्ये देखील घसरणीनंतर सुधारणा होत आहे.

Stock market updates : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 350 अकांनी वधारला, निफ्टी 16350 अंकांवर
Image Credit source: tv9
अजय देशपांडे

|

May 18, 2022 | 11:47 AM

मुंबई : जागतिक बाजारातून मिळत असलेल्या सकारात्मक संकेताचा परिणाम म्हणजे आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार (Stock market) सुरू होताच वधारला आहे. पहिल्याच सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) तेजी दिसून आली. ऑटो, बँकिंग क्षेत्र, आयटी, फार्मा या क्षेत्रांमध्ये आज मोठी वाढ दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे मेटल क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने त्यांचे शेअर कोसळले आहेत. आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 350 अकांनी वाढला तर निफ्टीने देखील 16350 अंकांचा टप्पा पार केला आहे. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये देखील तेजी असल्याचे पहायला मिळत आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.65 टक्क्यांनी तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.86 टक्क्यांनी वाढला आहे. आज टेक महिंद्रा, अ‍ॅक्सिस बँक, विप्रो, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस यांचे शेअर वधारले असून, दुसरीकडे मात्र पावरग्रीड, एनटीपीसी, टाटा स्टील, एचयूएल आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअरवर विक्रीचा दबाव वाढल्याने शेअर घसरले आहेत.

एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसीच्या शेअरमध्ये आज वाढ दिसून येत आहे. बीएसईवर एलआयसीचा शेअर 1.34 टक्क्यांच्या वाढीसह 887.20 रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी एलआयसीचा शेअर्स 8.62 टक्क्यांच्या घसरणीसह 867.20 रुपयांवर सुचीबद्ध झाला होता. मात्र आज शेअर्समध्ये थोडीशी तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. गुंतवणूक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात एलआयसीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येऊ शकते.

आशियाई बाजारात मंदीचे सावट

आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स 350 अकांनी वधारला तर निफ्टीने देखील 16350 अंकांचा टप्पा ओलांडला. मात्र आशियातील इतर शेअर बाजारात आज देखील मंदीचे वातावरण पहायला मिळत आहे. एसजीएक्स निफ्टीमध्ये 0.24 टक्क्यांनी घसरला आहे. निक्केई 0.25 तर स्ट्रेट टाइम्स 0.52 टक्क्यांनी घसरला. हँग सेंग 0.77 टक्क्यांनी खाली आला आहे.

अमेरिकन बाजारात तेजी

अमेरिकन शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकन शेअर बाजारात तेजी आहे. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजार हिरव्या निशाणावर बंद झाला. डाओ जोस 430 अंकांनी वधारला तर नेस्डेक इंडेक्समध्ये देखील 321 अंकांची उसळी पहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें