तुमच्याही गाडीला मिळेल सनरूफ फीचर, स्वस्तात आहे खास ऑफर

| Updated on: Feb 09, 2021 | 7:21 AM

देशातली आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (TATA Motors) 10 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटच्या कारमध्ये सनरूफ लावण्याची ऑफर केली आहे.

तुमच्याही गाडीला मिळेल सनरूफ फीचर, स्वस्तात आहे खास ऑफर
मोटारकारच्या पुढच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार सरकार करत आहे.
Follow us on

नवी दिल्ली : देशात अशा अनेक गाड्या आहेत ज्यांना सनरूफ (sunroof) नाही. सनरूफ विशिष्ट गाड्यांनाच लावलं जातं. इतकंच नाही तर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारला सनरूफ लावून मिळत होता. पण अशात देशातली आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (TATA Motors) 10 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटच्या कारमध्ये सनरूफ लावण्याची ऑफर केली आहे. टाटाने त्यांच्या नेक्सॉन (Nexon) कारमध्ये पहिलं सनरूफ फीचर सादर केलं आहे. यानंतर आता या फीचरची कॉपी फोर्ड (Ford) आणि महिंद्रासारख्या (Mahindra) कारमध्येही देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे. (sunroof feature is available in new cars priced is below rs 10 lakh)

खरंतर, सुरुवातीला काही कार कंपन्या सनरूफ फीचर असलेल्या कारसाठी 30 ते 80 हजार रुपये जास्तीचे देत होत्या. पण आता मारुती, महिंद्रा, टाटा, ह्युंदाई, किआ आणि फोर्ड या कंपन्यांनी त्यांच्या बजेटच्या गाड्यांमध्ये 10 लाख रुपयांपर्यंत सनरूफची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

Mahindra XUV300 – हल्लीच महिंद्राने नवीन XUV300 पेट्रोल व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. या कारमध्ये महिंद्राने सनरूफबद्दल खास सुविधा दिली आहे. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर याची सुरुवाती किंमत 9.4 लाख रुपये इतकी आहे.

Ford EcoSport – फोर्डनेही अलीकडेच त्यांच्या EcoSport कारमध्ये सनरूफ वैशिष्ट्यं जोडलं आहे. इकोस्पोर्टच्या penultimate व्हेरियंटमध्ये त्यांनी सनरूफ फीचर ग्राहकांसाठी दिलं आहे. हा व्हेरिएंट दोन्ही पेट्रोल आणि डिझेल कारमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर याची किंमत 9.79 लाख रुपये आहे.

Hyundai Venue – या ह्युंदाई कारमध्येही तुम्हाला सनरूफ फीचर देण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ही कार पेट्रोल आणि डिझेल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत 9.97 लाख रुपये आहे.

Kia Sonet – ही किआ कार एसयूव्ही सेगमेंटमधील सगळ्यात चांगली दिसणारी कार आहे. इतकंच नाहीतर या कारमध्ये तुम्हाला सनरुफ फिचरसाठी एचटीएक्स व्हेरिएंट खरेदी करावं लागणार आहे. याची किंमत 8..70 लाख रुपये आहे.

Hyundai i20 – ह्युंदाईने त्यांच्या नवीन Hyundai i20 मध्ये सनरूफ फीचर दिलं आहे. जुन्या Hyundai i20 मध्ये तुम्हाला सनरूफ फीचर मिळणार नाही. Hyundai i20 तुम्हाला सनरूफ फीचरसह खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 8.70 लाख रुपये द्यावे लागतील. (sunroof feature is available in new cars priced is below rs 10 lakh)

(sunroof feature is available in new cars priced is below rs 10 lakh)