TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीत होणार मोठा बदल, नोएल टाटा लीडरशिपच्या रोलमधून बाजूला होणार, कोण होणार नवीन चेअरमन?

टाटा समूहाची कंपनी असलेल्या कंपनीमध्ये आगामी काही महिन्यांत नेतृत्त्वाच्या पातळीवर मोठे बदल होणार आहेत. ही कंपनी कोणती आहे आणि शिवाय यानंतर आता कंपनीची धुरा कोणाच्या हाती जाणार, हे जाणून घ्या.

TATA ग्रुपच्या या कंपनीत होणार मोठा बदल, नोएल टाटा लीडरशिपच्या रोलमधून बाजूला होणार, कोण होणार नवीन चेअरमन?
noel tata retirement
| Updated on: Nov 07, 2026 | 1:52 PM

टाटा ग्रुप (Tata Group) च्या एका कंपनीमध्ये एक बदल होणार आहे. टाटाच्या वोल्टास कंपनीच्या नेतृत्त्वाच्या पातळीवर मोठे बदल होणार आहेत. कंपनीचे अध्यक्ष नोएल टाटा ११ नोव्हेंबर २०२६ रोजी आपल्या पदावरून निवृत्त होतील. त्यांच्या जागी सध्या ‘टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असलेले सुनील डिसोझा, १२ नोव्हेंबरपासून व्होल्टासचे नवीन अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारतील. यानंतर कंपनीचे नोएल टाटा सोबतचे संबंध पूर्णपणे संपणार नाहीत. यानंतर नोएल टाटा ‘चेअरमन एमेरिटस’ म्हणून नियुक्त होणार आहेत.

याआधीही अन्य कंपन्यांचा दिला राजीनामा

कंपनीने आधीच एका उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे. ती व्यक्ती मे २०२७ मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारेल. नियामक फाइलिंगमध्ये, वोल्टासने नमूद केले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने नोएल टाटा यांची अध्यक्ष एमेरिटस म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. ते हा कार्यभार १२ नोव्हेंबर २०२६ पासून स्वीकारतील. नोएल टाटा २००३ पासून वोल्टासशी जोडलेले आहेत. याआधी, त्यांनी यामध्ये ट्रेंट, टाटा स्टील, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा इंटरनॅशनल या सारख्या टाटा समूहातील इतर कंपन्यांच्या संचालक मंडळांतूनही राजीनामा दिला होता.

Loading...

कंपनीत हा बदल का?

नोएल टाटा यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. आता यंदा ते ७० वर्षांचे होतील. ‘कंपनी कायदा, २०१३’ मधील तरतुदींनुसार, ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक किंवा पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. याशिवाय या वयानंतर कोणीही अशा पदावर कायम राहू शकत नाही. यामुळेच नोएल टाटा टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांतून पायउतार होत आहेत.

कोण असणार नवीन अध्यक्ष?

आता यापुढे कंपनीचे नवीन अध्यक्ष हे सुनील डिसोझा असणार आहेत. सुनील डिसोझा सध्या टाटा समूहातील एफएमसीजी (FMCG) कंपनी, ‘टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. या आधी त्यांनी टाटाच्या अनेक ब्रँड्स साठी काम केलं आहे. आता ते १२ नोव्हेंबरपासून ते ‘वोल्टास’ (Voltas) च्या अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारणार आहेत.

व्होल्टास मध्ये मोठे बदल कधी होणार?

११ नोव्हेंबर २०२६ -नोएल टाटा अध्यक्षपदावरून निवृत्त होतील
१२ नोव्हेंबर २०२६ -सुनील डिसोझा नवीन अध्यक्ष बनतील
१२ नोव्हेंबर २०२६ -नोएल टाटा ‘चेअरमन एमेरिटस’ (अध्यक्ष एमेरिटस) बनतील
२४ मे २०२७ -सी. पी. मुकुंदन मेनन यांचा कार्यकाळ संपेल
२५ मे २०२७ – जयंत बालन पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक (MD) बनतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us