Pakistani Brand : कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांची धमाल! जगभरात आज पण डिमांड, तुमच्या घरात पण असेल हा ब्रँड

| Updated on: May 10, 2023 | 10:23 AM

Pakistani Brand : कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांना आजही जगभरात मागणी आहे. त्यातील एक ब्रँड तर आता उन्हाळ्यात भारतातही खूप चालतो. तुम्हाला कोणत्याही मॉलमध्ये हा ब्रँड सहज उपलब्ध दिसेल...

Pakistani Brand : कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांची धमाल! जगभरात आज पण डिमांड, तुमच्या घरात पण असेल हा ब्रँड
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानची अवस्था आज ‘ना घरा का ना घाट का’ अशी झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालता घालता या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कडेलोट व्हायला आला आहे. येथील राज्यकर्त्यांनी जनेतला भूकेकंगाल करुन सोडले आहे. आशिया खंडातील सर्वाधिक महागाई दर पाकिस्तानचा (Pakistan)आहे. येथील वस्तूंच्या किंमतीत गगनाला भिडल्या आहेत. हा देश श्रीलंकेच्या वाटेवर निघाला आहे. पण या देशाच्या काहा ब्रँड्सची आजही जागतिक बाजारात चलती आहे. या ब्रँड्सची भूरळ आजही कायम आहे. कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांना (Pakistan Brands) आजही जगभरात मागणी आहे. त्यातील एक ब्रँड तर आता उन्हाळ्यात भारतातही खूप चालतो. तुम्हाला कोणत्याही मॉलमध्ये हा ब्रँड सहज उपलब्ध दिसेल.

इतका महागाई दर
पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. गव्हाच्या पीठासाठी लोकांना कित्येक तास रांगेत उभे रहावे लागत आहे. मध्यमवर्गापेक्षा गरीबांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शहबाज शरीफ सरकारने महागाईपुढे गुडघे टेकवले आहे. पाकिस्तानमध्ये आशियातील सर्वाधिक महागाई आहे. या देशात महागाई दर (Inflation Rate) 36.4 टक्के इतका आहे. हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

हे ब्रँड लोकप्रिय
तर अशा ही परिस्थितीत पाकिस्तानच्या काही ब्रँड्सने जागतिक बाजारपेठांमध्ये मांड ठोकलेली आहे. या ब्रँड्स सर्वांनाच भूरळ पडली आहे. आपल्या नकळत आपण या ब्रँड्सला घरात ही आश्रय दिला आहे. त्यातील काही ब्रँड्स तुम्हाला सहज कोणत्याही मॉलमध्ये दिसतील.

हे सुद्धा वाचा

रुह अफजा
रुह अफजा (Rooh Afza) हा ब्रँड तुम्ही घरी पण आणला असेल. याचे उत्पादन पाकिस्तानात होते. या ब्रँडची भारतासह जगात मागणी आहे. रुह अफजा ब्रँडचा व्यवसाय जगभरातील जवळपास 33 देशांमध्ये आहे. पाकिस्तानची ही उत्पादने जगभरात लोकप्रिय आहेत.

Bar.B.Q Tonight
स्वादिष्ट जेवणासह हलक्याफुलक्या नाष्ट्यासाठी Bar.B.Q Tonight हा पाकिस्तानी ब्रँड जगभरात फेमस आहे. याच्या शाखा अनेक देशांमध्ये आहे. या ब्रँडची लाल किला रेस्टॉरंटची चेन ही लोकप्रिय आहे. या ब्रँडच्या शाखा दुबई, ओमान, मलेशियापासून सिंगापूर दरम्यानच्या सगळ्याच देशात आहे.

Pakola
पाकिस्तानचे कार्बोनेटेड ड्रिंक ब्राँड Pakola हे लोकप्रिय पेय आहे. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनाडा आणि ब्रिटेनमध्ये हा ब्रँड लोकप्रिय आहे. उन्हाळ्यासह इतर ऋतूतही हा ब्रँड फेमस आहे.

Student Biryani
1969 मध्ये केवळ एका छोट्या स्टॉलमध्ये स्टूडंट बिर्यानीची सुरुवात झाली होती. आज हा ब्रँड जागतिक बाजारात सर्वात लोकप्रिय आहे. स्टूंडट बिर्याणी तिच्या स्वादिष्ट चवीसाठी ओळखल्या जाते. हैदराबाद बिर्याणीसारखीच या ब्रँडची खास चव आहे. जगभरात या ब्रँडच्या शाखा आहेत.

Khaadi Brand
खादी ब्रँडने पण ब्रँडेड कपड्यांच्या बाजारात आपला शिक्का चालविला आहे. या ब्रँडचे शोरुम जगभरात उघडण्यात आले आहेत. युएई, अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया आणि कॅनाडा सारख्या देशात हा ब्रँड खूप लोकप्रिय आहे.

जुनैद जमशेद
जुनैद जमशेदवर ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडतात. हा वस्त्रदालनातील हटके ब्रँड म्हणून ओळखल्या जातो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटेन, कॅनाडा, अमेरिकेसह अनेक देशात या ब्रँडची वस्त्रदालन आहेत. फॅशनेबल कपड्यांच्या बाजारात, आमिर अदनान, चेन वन आणि गुल अहमद ब्रँडची पण चलती आहे.