अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत! विकासदर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 10% किंवा त्याहून अधिक राहणार : NITI आयोग

| Updated on: Nov 02, 2021 | 10:51 PM

दोन वर्षांपासूनच्या कोविड 19 महामारीमुळे देशाला आर्थिक विकासाच्या आघाडीवर अडचणीचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2021 मध्ये 9.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार, येत्या पाच वर्षांत भारत जलद आर्थिक विकास साधणारा सर्वात मोठा अर्थव्यवस्थेचा देश असेल, असंही कुमार यांनी सांगितलं.

अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत! विकासदर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 10% किंवा त्याहून अधिक राहणार : NITI आयोग
Niti Aayog
Follow us on

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर 10 टक्के किंवा त्याहून अधिक असेल, असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणालेर. एवढेच नाही तर 2022-23 या आर्थिक वर्षात ते 8 टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात कंपन्यांच्या भरभराटीसाठी मजबूत आर्थिक पाया घातला गेला आहे. त्यामुळे व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळाली आहे. त्याचा थेट आणि मोठा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे, असंही कुमार यांनी सांगितलं.

‘पुढील आर्थिक वर्षात विकासदर 8 टक्क्यांहून अधिक असेल’

दोन वर्षांपासूनच्या कोविड 19 महामारीमुळे देशाला आर्थिक विकासाच्या आघाडीवर अडचणीचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2021 मध्ये 9.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार, येत्या पाच वर्षांत भारत जलद आर्थिक विकास साधणारा सर्वात मोठा अर्थव्यवस्थेचा देश असेल, असंही कुमार यांनी सांगितलं. 2020-21 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 10 टक्के राहील. त्याच वेळी कोविड 19 महामारीतून बाहेर आल्यानंतर, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा विकासदर 8 टक्क्यांहून अधिक असेल.

RBI ने आर्थिक विकासदराचा अंदाज कमी केला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या आर्थिक विकासाचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्क्यांवर आणला. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021 मध्ये 9.5 टक्के आणि पुढील वर्षी 8.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला. कुमार म्हणाले की, आता परिस्थिती बदलत आहे आणि लोक भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. NITI आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले की, भारताचा संभाव्य शाश्वत विकासदर मध्यम कालावधीत 8 टक्क्यांपर्यंत असेल. ऑक्टोबर 2021 मध्ये IMF ने महामारीचा हवाला देत भारताच्या मध्यम-मुदतीच्या शाश्वत विकासाची शक्यता 6 टक्क्यांपर्यंत कमी केली होती.

संबंधित बातम्या

DA मध्ये पुन्हा वाढ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांपर्यंत फायदा; जाणून घ्या

युनियन बँक ऑफ इंडियाचा नफा तिप्पट वाढला, उत्पन्नातही फायदा

The growth rate will be 10% or more in FY2022 NITI Commission