प्रसिद्ध ‘हॉर्लिक्स’ कंपनीची विक्री, किंमत तब्बल…

| Updated on: Jan 16, 2021 | 4:19 PM

मुंबई : इंग्लंडमधील प्रसिद्ध हॉर्लिक्स कंपनीने भारतातील कंपनीची विक्री केली आहे. यूनिलिव्हरच्या हिंदुस्थान यूनिलिव्हरने(एचयूएल) खरेदी केली आहे. हिंदुस्थान यूनिलिव्हरने सोमवारी(3 डिसेंबर) पत्रक प्रसिद्घ करत याबाबतची माहिती दिली. पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडमधील प्रसिद्ध हॉर्लिक्स कंपनीने भारतातही आपल्या कंपनीची सुरुवात केली होती. एनर्जी ड्रिंक्स बनवणाऱ्या ‘गैल्क सोस्मिथ क्लाय’ला (जीएसके) अर्थात हॉर्लिक्सला हिंदुस्थान यूनिलिव्हरने तब्बल 3.8 अमेरिकन डॉलर अर्थात […]

प्रसिद्ध ‘हॉर्लिक्स’ कंपनीची विक्री, किंमत तब्बल...
Follow us on

मुंबई : इंग्लंडमधील प्रसिद्ध हॉर्लिक्स कंपनीने भारतातील कंपनीची विक्री केली आहे. यूनिलिव्हरच्या हिंदुस्थान यूनिलिव्हरने(एचयूएल) खरेदी केली आहे. हिंदुस्थान यूनिलिव्हरने सोमवारी(3 डिसेंबर) पत्रक प्रसिद्घ करत याबाबतची माहिती दिली. पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडमधील प्रसिद्ध हॉर्लिक्स कंपनीने भारतातही आपल्या कंपनीची सुरुवात केली होती.
एनर्जी ड्रिंक्स बनवणाऱ्या ‘गैल्क सोस्मिथ क्लाय’ला (जीएसके) अर्थात हॉर्लिक्सला हिंदुस्थान यूनिलिव्हरने तब्बल 3.8 अमेरिकन डॉलर अर्थात 31 हजार 700 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
हिंदुस्थान यूनिलिव्हर ही भारतातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. हॉर्लिक्सची खरेदी करण्यासाठी हिंदुस्थान यूनिलिव्हरने हॉर्लिक्सच्या एका शेअर्सच्या तुलनेत शेअर मार्केटमध्ये तब्बल 4.29 टक्के शेअर विकले.
हॉर्लिक्सही कंपनी प्रमुख्याने लहान मुले आणि महिलांसाठी न्युट्रिशन ड्रिंक,ओरल केअर ब्राँडसारखे उत्पादने उत्पादित करत होती. त्याचबरोबर हॉर्लिक्स इनो आणि क्रोसीन मेडिसीन्स उत्पादित करत होती. आता हे सर्व उत्पादने उत्पादित करण्याचा अधिकार हिंदुस्थान यूनिलिव्हरला मिळाला आहे.
पहिल्या महायुद्धानंतर (1914-18) हॉर्लिक्स ही कंपनी इंग्रजांनी भारतात आणली. या कंपनीने भारतीय सैन्याला अनेक वर्षे औषधं उपलब्ध करुन दिल. स्वातंत्र्यानंतर या कंपनीने आपल्या उत्पादनात काही बदल करत न्युट्रिशनमध्ये उत्पादन करण्यास सुरुवात केली.
हॉर्लिक्स या कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये 140 वर्षांपूर्वी झाली होती. जेम्स आणि विलियम्स हॉर्लिक्स यांनी ही कंपनी स्थापन केली. या कंपनीला हिंदुस्थान यूनिलिव्हरने खरेदी केल्यानंतरही इंग्लंडच्या हॉर्लिक्स कंपनीला उत्पादनात फरक पडणार नाही, असा यूनिलिव्हरने दावा केला आहे. हॉर्लिक्सने केवळ हिंदुस्थान युनिलिव्हरला भारतातील भागीदारी असलेली कंपनी विकली आहे.
गेल्या वर्षी हॉर्लिक्स या कंपनीची भारतात 4 हजार 200 कोटी रुपये इतकी वार्षिक उलाढाल झाली होती.