Narayana Murthy : महाभारतातील या पात्राने घातली भूरळ, नारायण मूर्ती यांच्यावर का होतोय कौतुकाचा वर्षाव

Narayana Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना महाभारतातील या पात्राने भूरळ घातली आहे. या व्यक्तिरेखचे मोठे गारुड त्यांच्या मनावर बसले आहे. त्यामुळेच त्यांचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.

Narayana Murthy : महाभारतातील या पात्राने घातली भूरळ, नारायण मूर्ती यांच्यावर का होतोय कौतुकाचा वर्षाव
| Updated on: Jul 18, 2023 | 2:32 PM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : आयटी सेक्टरमधील दिग्गज भारतीय कंपनी इन्फोसिसचे (Infosys IT Company) संस्थापक एन.आर नारायण मूर्ती साधी राहणी, उच्च विचाराने ओळखल्या जातात. त्यांचे नाव देशातील मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये घेण्यात येते. इन्फोसिसची अवघ्या 10 हजार रुपयांत सुरुवात झाली आहे. इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळात ज्या व्यक्ती सोबत होत्या. त्या अनेक ठिकाणी मोठं-मोठ्या पदावर आहेत. तर इन्फोसिसचा कारभार जगभर पसरला आहे. नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी मित्रांच्या मदतीने ही कंपनी जागतिक नकाशावर पोहचवले. त्यांना महाभारतातील या पात्राने भूरळ घातली आहे. या व्यक्तिरेखचे मोठे गारुड त्यांच्या मनावर बसले आहे. त्यामुळेच त्यांचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.

बालाजी मंदिरात धाव

नारायण मूर्ती पत्नी सुधा मूर्ती याच्यासह तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले. इन्फोसिसचे निकाल येणार आहे. त्यापूर्वी त्यांनी भगवान बालाजीचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिरात काही वस्तू दान केल्या. 16 जुलै रोजी हे दाम्पत्य तिरुपती मंदिरात आले होते. त्यांनी एक सोन्याचा शंख, सोन्याचा कासव मंदिरात दान (Golden Conch Tortoise Idol Donation) केले.

भगवत गीता प्रेरणास्थान

यापूर्वी पण या कुटुंबाने अनेक वस्तू दान केल्या. सुधा मूर्ती या तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) ट्रस्ट बोर्डाचे पूर्व सदस्य आणि इन्फोसिस फाऊंडेशनचे पूर्व अध्यक्ष आहेत. त्यांनी या तिरुपती मंदिरात एक सोन्याचं अनुष्ठान पात्र दान केले आहे. नारायण मूर्ती यांच्यानुसार, भगवत गीतेने त्यांना सर्वात जास्त प्रेरणा दिली आहे.

कर्णाचे मनपटलावर गारुड

एका कार्यक्रमात त्यांनी महाभारतातील या पात्राने मोहिनी घातल्याचे सांगितले. महाभारतातील या पात्राने सर्वाधिक प्रेरित केल्याचे त्यांनी सांगितले. कर्ण आणि त्याची दानशूरतेने मनपटलावर गारुड घातल्याचे त्यांनी सांगितले. कर्णाचे अनेक किस्से आणि कथा ऐकून मोठा झाल्याचे त्यांनी सांगितले. कर्णाचा चांगुलपणा आणि दानशुरता अंगी बानण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. इन्फोसिसचा नफाच नाही तर इतर पण फायदा शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तिमाही निकाल

20 जुलै रोजी इन्फोसिसचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी दाम्पत्याने भगवान तिरुपतीचे दर्शन घेतले. ज्यांनी इन्फोसिस आपली कंपनी मानली. त्यांच्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांसोबत काम करण्याचा आनंद घेतला असे त्यांनी सांगितले. नफा कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्याचा आनंद काही औरच असल्याचे त्यांनी सांगितले.