
श्रीमंत होणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. अनेक जण शुन्यातून मोठी झालेल्यांची उदाहरणं कमी नाहीत. त्यासाठी काही सवयी अंगी बाणाव्या लागतात. तर तुम्हाला श्रीमंतीचा मार्ग गवसतो. या छोट्या छोट्या सवयींमुळे हळूहळू संपत्ती वाढते. ही संपत्ती टिकते. आर्थिक स्थिरतेचा मार्ग या सवयीतून साध्य होतो. श्रीमंतीला आपण मोठ्या उत्पन्नाशी अथवा व्यावसायिक यशाशी जोडतो. पण तो श्रीमंतीचा एक भाग मानल्या जातो. जे या लहान गोष्टींकडे लक्ष देतात. त्यांना कायमस्वरुपी आर्थिक स्थिरता निर्माण होते.
एकदम साध्या सवयी, उपाय मात्र प्रभावी
या सवयी कदाचित तुम्हाला रोमांचक वाटणार नाहीत. त्या अत्यंत साध्या वाटतील. पण जी व्यक्ती या छोट्या सवयी नियमीत अंगिकारतील, त्यांना त्याचा फायदा होईल. या सवयी जरी साध्या असल्या तरी त्याचा उपाय मात्र प्रभावी ठरेल. ही संपत्ती या सवयींमुळे हातातून निसटत नाही. या सवयी तुम्हाला संपत्ती वाढवण्यासाठी मदत करतात. या पाच सवयी नियमीतपणे अंगिकारल्यास तुमच्याकडे संपत्ती टिकून राहील.
संपत्ती एकाच वेळी निर्माण होत नाही. त्यासाठी रोज काही तरी करावे लागते. तुमची संपत्ती वाढण्यासाठी काय काय करता येईल याचा रोज आढावा घ्या. रोज काही बचत करा. स्वतःला आणि तुमची ध्येय अपडेट करण्यासाठी रोज थोडातरी वेळ स्वतःला द्या. या छोट्या सवयींचे तुम्हाला काही दिवसात मोठे परिणाम दिसतील.
यशस्वी लोक आयुष्यभर काही ना काही शिकत असतात. पैसे, व्यवसाय आणि वैयक्तिक अनुभव समृद्धीसाठी रोज काही तरी शिका, एखादा अभ्यासक्रम पूर्ण करा. नवीन गोष्टी शिका. नियमीत वाचन करा. चांगले विचार करण्यास, मोठे निर्णय घेण्यास आणि सतत पुढे जाण्यासाठी ही सवय तुम्हाला नक्कीच मदत करेल.
तुमचा आर्थिक ग्राफ, आलेख किती वाढला, किती कमी झाला. तुमचे उत्पन्न, खर्च आणि बचतीचा नियमीपतपणे मागोवा घ्या. यासाठी एखादी स्प्रेडशीट अथवा अॅपचा ही तुम्हाला वापर करता येईल. त्याआधारे कुठे आणि किती मोठी झेप घ्यायची याचा अंदाज येईल.
तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. दरमहा इंडेक्स फंड, ठेवी, शेअर बाजार यातील गुंतवणुकीचा आढावा घ्या. तुमच्या खात्यात छोट्या छोट्या रक्कमा जोडा. त्यावर किती व्याज मिळाले. किती रक्कम वाढली हे तपासा. पैसा मोठा होताना त्याचा आनंद घ्या. बदल करायचा असेल तर तज्ज्ञांशी बोलून नवीन योजना निवडा.
नम्रपणा आणि जिज्ञासूपणा
श्रीमंत होण्यासाठी नम्रता आणि जिज्ञासू असणं आवश्यक आहे. श्रीमंत लोक हे नम्र असतात. आपल्याला सर्व काही माहिती आहे, या अविर्भावात ते राहत नाहीत. ते प्रश्न विचारतात. इतरांकडून शिकतात. स्थिर असतात. यश त्यांच्या डोक्यात चढत नाही. यशाने ते हुरळून जात नाहीत.