Today’s gold-silver prices : सोन्या-चांदीच्या दरात तेजी, सोन्याचे दर 54 हजारांवर

| Updated on: Apr 18, 2022 | 2:10 PM

सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढल्याने भारतीय सराफा बाजारात देखील सोन्या-चांदीच्या दरात तेजी आली आहे.

Todays gold-silver prices : सोन्या-चांदीच्या दरात तेजी, सोन्याचे दर 54 हजारांवर
सोन्याचे आजचे दर
Image Credit source: TV9
Follow us on

Gold Silver Price : सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढल्याने भारतीय सराफा बाजारात देखील सोन्या-चांदीच्या दरात तेजी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार (MCX) सोन्याच्या दरात (Gold Price) प्रति तोळा 462 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price) किलोमागे 891 रुपयांची वाढ झाली आहे. आतंरराष्ट्रीय बाजारत वाढलेले सोन्या, चांदीचे भाव, युक्रेन, रशिया युद्ध आणि कच्च्या तेलातील चढ उतारांमुळे काही दिवसांपासून सोन्याचे दर वधारताना दिसत आहेत. आज सोन्याचे दर 0.87 टक्क्यांनी वाढून 53,454 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 1.29 टक्क्यांनी वाढून 69,923 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने दरवाढ होत असल्याने सोन्यामधील गुंतवणूक देखील वाढत आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

  1. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49,550 रुपये आहेत, तर 24 कॅरट सोन्याचे दर 54060 प्रति तोळा इतके आहे.
  2. पुण्यात देखील आज सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49580 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर 54090 रुपयांवर पोहोचले आहेत.
  3. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49,580 तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54090 रुपये एवढे आहेत.
  4. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49,550 तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54040 रुपये एवढे आहेत.