AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SHARE MARKET: सेन्सेक्स 700 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांचा पाय खोलात, 2 दिवसांत 6 लाख कोटींवर पाणी

आज टॉप-30 शेअर्समध्ये केवळ रिलायन्स आणि आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये तेजी नोंदविली गेली. तर सर्व 28 शेअर घसरणीसह बंद झाले. आजच्या घसरणीत सर्वाधिक भर एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस शेअर्समध्ये पडली.

SHARE MARKET: सेन्सेक्स 700 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांचा पाय खोलात, 2 दिवसांत 6 लाख कोटींवर पाणी
घसरणीचे सलग 6 दिवस, शेअर बाजार गडगडलाImage Credit source: TV9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 19, 2022 | 8:57 PM
Share

नवी दिल्लीशेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. आज (मंगळवारी) सेन्सेक्समध्ये 700 अंकाहून अधिक घसरण नोंदविली गेली. आज सेन्सेक्स 703 अंकांच्या घसरणीसह 56463 वर पोहोचला. निफ्टी 215 अंकांच्या घसरणीसह 16958 वर बंद झाला. आज टॉप-30 शेअर्समध्ये केवळ रिलायन्स आणि आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये तेजी नोंदविली गेली. तर सर्व 28 शेअर घसरणीसह बंद झाले. आजच्या घसरणीत सर्वाधिक भर एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस शेअ्र्रर्सची पडली. एचडीएफसी बँकेचा शेअर सलग नवव्या दिवशी घसरणीसह बंद झाला. रिलायन्स शेअर्समध्ये (RELIANCE SHARES) आज 3.16 टक्क्यांच्या तेजीची नोंद झाली. आज निफ्टी आयटीमध्ये 3 टक्के, एफएमसीजीमध्ये 2.82 टक्के, रियल्टी इंडेक्समध्ये 2.47 टक्के, फायनान्शियल्स सर्व्हिसेस मध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविली गेली. आज (मंगळवार) बीएसई सूचीबद्ध (BSE LISTED) (लिस्टेड) कंपन्यांचा मार्केट कॅप घसरणीसह 265.35 लाख कोटींवर पोहोचला आहे.

आजचे वधारणीचे शेअर्स (Todays Top gainers)

अपोलो हॉस्पिटल (5.75%) कोल इंडिया (4.38%) रिलायन्स (3.81%) आयसीआयसीआय बँक (1.12%) बीपीसीएल (1.10%)

आजचे घसरणीचे शेअर्स (Todays Top Loosers)

एचडीएफसी (-5.45%) एचडीएफसी लाईफ (-4.81%) एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (-4.15%) एचडीएफसी बँक (-3.82) टाटा कॉन्स प्रॉडक्ट (-3.76%)

एचडीएफसी गुंतवणुकदारांचा पाय खोलात?

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड (HDFC BANK) विलिनीकरणाच्या चर्चेनंतर गुंतवणुकदारांत उत्साह संचारला होता. त्यामुळे शेअर बाजारातही सकारात्मक परिणाम नोंदवला गेला. मात्र, उत्साह अधिक काळ शेअर बाजारावर दिसून आला नाही. काही दिवसांतच शेअर मध्ये घसरणीचे सत्र सुरू झाले. गेल्या नऊ दिवसांत गुंतवणुकदारांना तब्बल 2.6 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. एचडीएफसीच्या शेअरमध्ये (HDFC SHARE) नऊ ते दहा टक्क्यांची घसरण नोंदविली गेली आहे.गेल्या महिन्यात चार एप्रिलला एचडीएफसीची मार्केट वॅल्यू (MARKET VALUE) 9,18,591 कोटी रुपये होती आणि गेल्या नऊ दिवसांत 1.67 लाख कोटी रुपयांच्या नुकसानीसह 7,51,421 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एचडीएफसी लिमिटेडची मार्केट वॅल्यू 4,85,692 कोटी रुपये होती. त्यामध्ये घट होऊन 3,94,097 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्केट वॅल्यूमध्ये 91,595 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Mukesh Ambani Birthday: अंबानींचं रिटर्न गिफ्ट! 65वा वाढदिवस 63 हजार कोटींचा नफा, रिलायन्स शेअर्स टॉपला

Bank Merger : विलिनीकरणाचा उत्साह मावळला, एचडीएफसी गुंतवणुकदार तोट्यात; 9 दिवसात 2 लाख कोटींवर पाणी

Air India : टाटा ग्रुपने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले, पंधरा दिवसांत दोन मोठ्या गिफ्टची घोषणा

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार