पाकड्यांना साथ देणं तुर्कीला पडलं भारी, अंबानींकडूनही मोठा दणका

मिंट्राने सर्व तुर्की ब्रँडची विक्री तात्पुरती थांबवली आहे, ज्यामध्ये इंटरनेटवरील दिग्गज असलेल्या अलिबाबाच्या मालकीच्या ट्रेंडियोलचा समावेश आहे, ज्याचे भारतात विशेष मार्केट अधिकार आहेत. रिलायन्सने त्यांच्या अजिओ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या कोटन, एलसी वैकीकी आणि मावी सारख्या तुर्की पोशाख ब्रँडचा पोर्टफोलिओ देखील रद्द केला आहे. यामुळे तुर्कीला चांगलाच दणका बसला आहे.

पाकड्यांना साथ देणं तुर्कीला पडलं भारी, अंबानींकडूनही मोठा दणका
मुकेश अंबानी
| Updated on: May 17, 2025 | 9:34 AM

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकने केलेल्या आगळीकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तानमधील या लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर बॉयकॉट तुर्की ही मोहीम तीव्र झाली असून बहिष्काराच्या वाढत्या आवाहनांमुळे आता मिंत्रा आणि रिलायन्सच्या मालकीच्या अजिओने त्यांच्या पोर्टलवर तुर्की पोशाख ब्रँडची विक्री थांबवली आहे. या घडामोडींची माहिती असलेल्या दोन उद्योग अधिकाऱ्यांच्या मते, मिंट्राने सर्व तुर्की ब्रँडची विक्री तात्पुरती थांबवली आहे, ज्यामध्ये इंटरनेट दिग्गज अलिबाबाच्या मालकीच्या ट्रेंडियोलचा समावेश आहे, ज्याचे भारतात विशेष मार्केट अधिकार आहेत. तसेच रिलायन्सने त्यांच्या अजिओ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या कोटन, एलसी वैकीकी आणि मावी सारख्या तुर्की पोशाख ब्रँडचा पोर्टफोलिओ देखील रद्द केला आहे.

वर उल्लेख केलेल्या एका अधिकाऱ्याने ईटीच्या अहवालात म्हटले आहे की गेल्या आठवड्याच्या शेवटी तणाव वाढल्याने, मिंट्रावरील तुर्की ब्रँडची व्हिजीबिलीटी ( दृश्यमानता) सक्रियपणे मर्यादित करण्यात आली आणि गुरुवारी ते पूर्णपणे निलंबित करण्यात आले. “ मात्र ब्रँड्सच्या उपलब्धतेबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी, समस्या आणखी वाढल्यामुळे कंपनी तिच्या भागीदारींचे पुनर्मूल्यांकन करत आहे. ट्रेंडियोल, ही तुर्कीमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स फर्म असून, मिंत्रावरील सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक विक्री होणारा असा तरराष्ट्रीय महिला पाश्चात्य पोशाख ब्रँड आहे. तथापि, मिंत्रा ने अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.”

मोठा निर्णय घेत रिलायन्सचाही दणका

तर दुसरीकडे, रिलायन्सनेही तुर्कीला दणका दिला आहे. राष्ट्रीय हीत सर्वोच्च ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर आम्ही ठाम आहोत, असे रिलायन्सने नमूद केलं. आम्ही तुर्कीमधील आमचे कार्यालय देखील बंद केले आहे, असे रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितलं. रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच वर्षांपूर्वी तुर्की कापड कंपनी किवाँक टेक्सटाइलसोबत भागीदारी करून एक शाश्वत कपड्यांचा ब्रँड तयार केला. ही भागीदारी खूप पूर्वीच संपली होती, असे रिलायन्सच्या प्रवक्त्याने नमूद केलं.

आज, ते असंख्य जागतिक ग्राहकांपैकी एक आहेत ज्यांना कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही, असे प्रवक्त्याने सांगितले. त्यांचा व्यवसाय हा आरआयएलच्या कामकाजाचा एक छोटासा भाग असल्याचेही त्याने स्पष्ट केलं.

तुर्की ब्रँड काढून टाकण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरू झाली आणि शुक्रवारी तुर्की ब्रँड पूर्णपणे काढून टाकण्यात आला. मात्र मेझॉन अजूनही भारतात तुर्की कपडे आणि जीवनशैली ब्रँड विकत आहे असे सूत्रांनी सांगितलं. शुक्रवारी, देशभरातील 125 हून अधिक व्यावसायिक नेत्यांनी तुर्की आणि अझरबैजानसोबत प्रवास आणि पर्यटनासह सर्व प्रकारच्या व्यापार आणि व्यावसायिक सहभागावर बहिष्कार टाकण्याचे वचन दिले.

कॅटचाही बहिष्कार

अखिल भारतीय व्यापारी परिसंघान (CAIT) शुक्रवारी तुर्की आणि अझरबैजानसोबतच्या सर्व व्यापार आणि व्यावसायिक संबंधांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल भारतातील अनेक संघटनांनी या दोन्ही देशांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. कॅटच्यानुसार, या निर्णयात तुर्की आणि अझरबैजानी वस्तूंवर देशव्यापी बहिष्कार घालण्याचा समावेश आहे. यामध्ये, संपूर्ण भारतातील व्यापारी या देशांमधून होणारी आयात थांबवतील.