TVs देशातील मोठ्या बिझनेस फॅमिलीत संपत्तीची लढाई, मुलीने वडिलांना पाठवली कायदेशीर नोटीस
TVs ही देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी आहे. देशातील ही एक मोठी बिझनेस फॅमिली आहे. त्यांच्यात आता कौटुंबिक संपत्तीची लढाई सुरु झाली आहे. वेणू श्रीनिवासन यांच्या ब्रांचच TVS मोटर कंपनीवर नियंत्रण आहे.

TVS कंपनीत मालकी हक्काचा वाद सुरु आहे. आता ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. TVS होल्डिंग्सचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणू यांनी मद्रास हाय कोर्टात धाव घेतली आहे. तिने वडिलांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. TVS कुटुंबात ‘वेणु श्रीनिवासन ब्रांच’च्या संपत्तीमध्ये औपचारिक वाटणीची मागणी केली आहे. मिडिया रिपोर्ट्नुसार कोर्ट या प्रकरणात 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे. आपसात चर्चा करुन तोडगा काढण्याचे सर्व प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याकडे कोर्टात जाण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही असं मिडिया स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. पणजोबा आणि आजोबांच्या वारशावर माझ्या भावाचा जितका अधिकार आहे, तितकाच माझाही हक्क आहे. डॉ. लक्ष्मी यांनी संयुक्त कुटुंबाच्या संपत्तीची वाटणी आणि आपला हक्क मागितला आहे. त्या शिवाय माहिती लपवल्यामुळे कोर्टाची मदत घ्यावी लागत आहे असं डॉ. लक्ष्मी वेणू यांनी याचिकेत म्हटलं आहे.
वेणू श्रीनिवासन यांच्या ब्रांचच TVS मोटर कंपनीवर नियंत्रण आहे. ती भारतातील तिसरी सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी आहे. सध्या लक्ष्मी वेणू यांचा लहान भाऊ सुदर्शन वेणू या कंपनीचा प्रमुख आहे. ते TVS मोटर कंपनीचे CMD आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला लक्ष्मी वेणू यांच्यावतीने मीडियाला एक नोट देण्यात आली. त्यात ‘हिंदू उत्तराधिकार अधिनियम, 1956’ चा उल्लेख आहे. 2005 साली या कायद्यात संशोधन करुन कलम 6 जोडण्यात आलं. ज्यामुळे महिलांना सुद्धा कौटुंबिक संपत्तीत पुरुषांच्या बरोबरीने उत्तराधिकारी मानण्यात आलं.
चुकीच्या पद्धतीने वंचित ठेवलं
‘संयुक्त कुटुंबाच्या संपत्तीत जो हिस्सा आहे, त्यापासून चुकीच्या पद्धतीने वंचित ठेवलं जात आहे’ असं लक्ष्मी वेणू या महिन्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं. कायदा किंवा आधुनिक भारतात पितृसत्तेला काही स्थान नाहीय. संयुक्त कुटुंबात मुलींच्या संपत्तीच्या अधिकाराला एकतर्फी निर्णयांनी कॉर्पोरेट व्यवस्थेच्या माध्यमातून संपवता येऊ शकत नाही असं लक्ष्मी वेणू यांचं म्हणणं आहे. एप्रिल 2025 च्या निर्णयाचा उल्लेख केला. त्यात भाऊ सुदर्शन वेणू यांना TVS मोटर कंपनीत ‘सिग्निफिकेंट बेनिफिशियल ओनर’ बनवण्यात आलेलं. लक्ष्मी वेणू यांनी 2020 सालच्या TVS कुटुंबाच्या करारातंर्गत संपत्ती विभाजनाची मागणी केली आहे. या संपत्तींमध्ये TVS होल्डिंग्स, TVS मोटर कंपनी, TVS क्रेडिट सर्विसेज आणि सुंदरम-क्ले ‘टन’ हिस्सेदारी आहे.