AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिपळूणमध्ये भरदिवसा कोयत्यांचा थरार! तिघांवर सपासप वार, हल्ल्याचा VIDEO व्हायरल; हल्लेखोर फरार

Machete Attack in Chiplun: चिपळूणमध्ये भरदिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात तिघे जखमी झाले आहेत. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चिपळूणमध्ये भरदिवसा कोयत्यांचा थरार! तिघांवर सपासप वार, हल्ल्याचा VIDEO व्हायरल; हल्लेखोर फरार
| Updated on: Nov 25, 2026 | 4:56 PM
Share

रत्नागिरी जिल्ह्यात एक थरारक घटना घडली आहे. चिपळूणमध्ये भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकूण तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे चिपळूण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणमध्ये आज दुपारी काही जणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले. यावेळी हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एकूण तीन जण जखमी झाले. त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिघांवरही उपचार सुरू आहेत.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोयत्याने वार करत असल्याचे दृश्य दिसत असल्याची माहिती आहे. भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. जखमींची माहिती घेण्यासह घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मात्र, हल्ला केल्यानंतर संबंधित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक तपास करत आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्लेखोर कोण होते आणि या घटनेमागे पूर्ववैमनस्य होते की अन्य काही कारण, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलीस तपासातून या घटनेमागील कारण आणि हल्लेखोरांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ