AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vimi : पतीनं सोडलं, बॉयफ्रेंडनं वेश्याव्यवसायात ढकललं; वयाच्या 34व्या वर्षी मृत्यू, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह स्मशानभूमीत नेलेला हातगाडीवरून

Bollywood Actress : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. अभिनेत्रीचा वयाच्या 34व्या वर्षी मृत्यू झाला.

Vimi : पतीनं सोडलं, बॉयफ्रेंडनं वेश्याव्यवसायात ढकललं; वयाच्या 34व्या वर्षी मृत्यू, प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह स्मशानभूमीत नेलेला हातगाडीवरून
| Updated on: Nov 25, 2026 | 4:48 PM
Share

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी आणि पैसा मिळवणं जितकं कठीण आहे, तितकंच हे यश टिकवणंही अवघड आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटं आली आणि अखेर त्यांचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे विमी. 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हमराज’ चित्रपटातून रातोरात स्टार झालेल्या विमी यांनी एकेकाळी एका चित्रपटासाठी तब्बल तीन लाख रुपये मानधन घेतलं होतं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं. पतीपासून दुरावा, प्रियकराकडून फसवणूक, व्यसनाधीनता आणि एकाकीपणा अशा अनेक संकटांचा सामना करत वयाच्या अवघ्या 34वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

पहिल्याच चित्रपटातून मिळाली प्रचंड लोकप्रियता

विमी यांनी 1967 मध्ये बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘हमराज’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुनील दत्त, राजकुमार आणि शशी कपूर यांसारखे लोकप्रिय कलाकार होते. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि विमी यांचं नाव घराघरांत पोहोचलं. पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. ‘आबरू’, ‘वचन’, ‘पतंगा’ आणि ‘नानक नाम जहाज है’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं. अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्या एका चित्रपटासाठी जवळपास तीन लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगितलं जातं.

पतीपासून विभक्त, संसारात निर्माण झाला दुरावा

विमी यांचं लग्न शिव अग्रवाल यांच्याशी झालं होतं. त्या चित्रपटसृष्टीत आल्या तेव्हा विवाहित होत्या आणि त्यांना दोन मुलंही होती. त्यांचे पती व्यावसायिक कुटुंबातील होते. सुरुवातीला पतीनं त्यांच्या अभिनय कारकिर्दीला पाठिंबा दिला. मात्र, पुढे वैवाहिक आयुष्यात मतभेद वाढू लागले. काही वृत्तांनुसार, विमी यांच्या चित्रपट कारकिर्दीमुळे त्यांच्या संसारात तणाव निर्माण झाला. पती आणि सासरच्या मंडळींसोबतचे संबंध बिघडले. अखेर विमी आणि शिव अग्रवाल विभक्त झाले. संसार मोडल्यानंतर विमी यांना वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

पतीपासून विभक्त झाल्यानंतर विमी यांच्या आयुष्यात जॉली नावाच्या एका चित्रपट वितरकाची एंट्री झाली. चित्रपटसृष्टीत पुन्हा काम मिळवण्यासाठी आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी जॉलीवर विश्वास ठेवला. मात्र, हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरला. जॉलीनं विमी यांचा गैरफायदा घेतल्याचा आणि त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं. या नात्यामुळे विमी यांचं मानसिक खच्चीकरण झालं. चित्रपटांमध्ये काम मिळणं बंद झाल्यानंतर विमी यांनी कोलकात्यात स्वतःचा कापड व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा व्यवसायही यशस्वी झाला नाही. वाढतं कर्ज, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक आयुष्यातील तणाव यामुळे त्या पूर्णपणे खचल्या. दरम्यान, विमी यांना मद्यपानाचं व्यसन लागलं. हळूहळू त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला. एकेकाळी आलिशान आयुष्य जगणाऱ्या आणि मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या या अभिनेत्रीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली.

वयाच्या 34व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

22 ऑगस्ट 1977 रोजी विमी यांनी वयाच्या 34व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मद्यपानाच्या व्यसनामुळे त्यांच्या यकृतावर गंभीर परिणाम झाला होता. मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पुरेशी व्यवस्था नव्हती. त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी हातगाडीचा वापर करण्यात आला होता.

Follow Us
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...