AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Attack : अरे आम्ही कात्रजचे भाई…आधी मंदारवर सपासप वार नंतर गगनभेदी घोषणा, पुण्यात प्रचंड दहशत!

एका हल्लेखोराच्या हतात बंदूक होती. चार जण मंदारवर वार करत होते. हल्लेखोरांनी मंदारवर पाच ते सहा वार केले. त्यानंतर गाडीवरून निघून गेले, असं प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं.

Pune Attack : अरे आम्ही कात्रजचे भाई...आधी मंदारवर सपासप वार नंतर गगनभेदी घोषणा, पुण्यात प्रचंड दहशत!
pune mandar kiwale attack caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 4:22 PM
Share

Pune Shivajinagar Attack News : पुण्यातील शिवाजीनगर भागातील न्यायालय परिसरात हादरवून टाकणारी घटना घडली. येथे एका हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या मंदार किवळे याच्यावर भर दिवसा सपासप वार करण्यात आले. पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार केल्याने तो रक्तबंबाळ झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर तो त्याच भागात कोसळून पडला. दरम्यान, या घटनेतील हल्लेखोरांची ओळख पटलेली आहे. एकूण सहा जण हल्लेखोर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या पथकाची स्थपना करण्यात आली असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, हल्ला करणारे आरोप हे गुंड प्रवृत्तीचे होते असे बोलले जात आहे. हल्ला करताना त्यांच्या डोळ्यात कसलीही भीती नव्हती. सोबतच हल्ला केल्यानंतर ‘आम्ही कात्रजचे भाई’ असं म्हणत हल्लेखोरांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मंदार किवळे उठला आणि चालू लागला

शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर नेमकं काय घडलं, याची सविस्तर माहिती एका प्रत्यक्षदर्शीने टीव्ही 9 मराठीला दिली आहे. यावेळी बोलताना, “आम्ही मंदार किवळेवर हल्ला करताना पाहिलं. पंक्चर वाल्याचे भांडण झाले असेल असे आम्हाला वाटलं. परंतु मंदार खूपच रक्तबंबाळ झाला. हल्ला झाल्यानंतर मंदार किवळे उठला आणि चालू लागला. हा हल्ला होत असतानाच कोणीतरी पोलीस आले, पोलीस आले असे ओरडले. त्यानंतर ते हल्लेखोर पळून गेले,” असं एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं.

आम्ही कात्रजचे भाई

तसेच, आम्ही इथं टायपिंग करत बसलो होतो. जोरात आवाज आला. म्हणून आम्ही बाहेर आलो. पाहतो तर पाच ते सहा जण कोयता घेऊन एकावर हल्ला करत होते. आपण वाचवायला जाऊ म्हणून मी पुढे गेलो, परंतु एका हल्लेखोराच्या हतात बंदूक होती. चार जण मंदारवर वार करत होते. हल्लेखोरांनी मंदारवर पाच ते सहा वार केले. त्यानंतर गाडीवरून निघून गेले. निघताना ते आम्ही कात्रजचे भाई, असं बोलत निघून गेले असा धक्कादायक घटनाक्रम दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितला.

दरम्यान, मंदार किवळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपस्थित लोकांनी 108 क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका बोलवली. तसेच पोलिसांनाही संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर जखमी मंदारला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Follow Us
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा